शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मृतदेहावर ३ दिवसांनी अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:32 IST

माझ्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार राहतील, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेल्या शंकर भाऊराव चायरे (५५ रा. राजूरवाडी, ता. घाटंजी) या शेतकºयाच्या मृतदेहाचे अखेर तीन दिवसांनंतर शवविच्छेदन होऊन रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले.

यवतमाळ : माझ्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार राहतील, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेल्या शंकर भाऊराव चायरे (५५ रा. राजूरवाडी, ता. घाटंजी) या शेतक-याच्या मृतदेहाचे अखेर तीन दिवसांनंतर शवविच्छेदन होऊन रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले. पालकमंत्री मदन येरावार आणि माजी खासदार नाना पटोले यांनी मध्यस्थी केल्यानंतर चायरे कुटुंबीयांनी उपोषण सोडले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीही चायरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊ देणार नाही, अशी भूमिका मृताच्या कुटुंबीयांनी घेतली होती. त्यामुळे गेले तीन दिवस मृतदेह येथील शवविच्छेदनगृहात पडून होता. मृताच्या कुटुंबीयांपैकी एकाला शासकीय नोकरी, कुटुंबाला एक कोटी रुपयांची तत्काळ मदत आदी मागण्या करण्यात आल्या. मृताची पत्नी, तीन मुली आणि मुलगा आकाश यांनी उपोषण सुरू केले होते. माजी खासदार नाना पटोले यांनी राजूरवाडी येथे जाऊन चायरे कुटुंबीयांना उपवास सोडण्याची विनंती केली.तसेच यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मदन येरावार यांनी चायरे कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा राजूरवाडी येथे अंत्यसंस्कार पार पडले.