शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिंतामणी देवस्थानच्या विश्वस्तांसाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: July 24, 2016 00:41 IST

येथील श्री चिंतामणी देवस्थानच्या विश्वस्तांसाठी २ आॅगस्ट रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहे.

शिफारशीसाठी धावपळ : लोकप्रतिनिधींकडे चकरा वाढल्या गजानन अक्कलवार कळंब येथील श्री चिंतामणी देवस्थानच्या विश्वस्तांसाठी २ आॅगस्ट रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहे. विश्वस्त म्हणून नेमणूक होण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीय शिफारशी मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू करण्यात आले आहे. विश्वस्त होण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी अर्ज सादर केलेले आहे. यात राजकीय पक्षांशी संबंधित असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एवढेच नाही तर, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, माजी विश्वस्त, शेतकरी, व्यावसायिक यांनीही धडपड चालविली आहे. त्यांनी आपल्या गॉडफादरमार्फत फिल्डींग लावण्याच्या कामाला वेग दिला आहे. स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री, राज्यमंत्री एवढेच नाही तर, मंत्र्यांपर्यंत हा विषय नेण्यात आला आहे. त्यांच्या संमतीनेच अनेकांनी अर्ज सादर केले आहे. एकंदरीत अर्जाची संख्या लक्षात घेता विश्वस्त बनने पाहिजे तेवढे सोपे नाही, हे दिसून येते. काहींनी तर धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संधान बांधण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेष म्हणजे श्री चिंतामणी देवस्थानमध्ये कार्यरत अ‍ॅडव्हॉक बॉडी एप्रिल २०१५ मध्ये न्यायालयाने बरखास्त केली होती. नवीन विश्वस्तांची रितसर निवड करण्याच्या सूचना न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना दिल्या. यावरून एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला. आता कुठे विश्वस्त निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मागील १३ वर्षांपासून चिंतामणी देवस्थानमधील विश्वस्तांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू होती. आधीच फार काळ चाललेल्या विश्वस्तांच्या भांडणामुळे श्री चिंतामणीचा विकास ठप्प झाला. त्यामुळे सहधर्मादाय आयुक्त, यवतमाळ यांना श्री चिंतामणी देवस्थानच्या घटनेतील कलम नऊ प्रमाणे नवीन विश्वस्तांची निवड प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश होते. यानुसार नवीन विश्वस्तांची निवड केली जाणार आहे.