शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी येथे प्राऊटिस्टचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:45 IST

प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्या वतीने तीन दिवसीय कॅडर ट्रेनिंग कॅम्प जलाराम मंदिर सभागृहात घेण्यात आला. शिबिराच्या उद्घाटनानंतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून सरकारच्या धोरणाविरोधात आक्रोश नोंदविला.

ठळक मुद्देसरकारविरुद्ध घोषणा : जलाराम मंदिरात कॅडर ट्रेनिंग कॅम्प

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्या वतीने तीन दिवसीय कॅडर ट्रेनिंग कॅम्प जलाराम मंदिर सभागृहात घेण्यात आला. शिबिराच्या उद्घाटनानंतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून सरकारच्या धोरणाविरोधात आक्रोश नोंदविला.अतिक्रमण जमिनीचे पट्टे, घरकुल, शौचालय, विहरी व इतर अनुदानाच्या योजना योग्य लाभार्थ्यांना मिळत नाही, थकित अनुदान हप्ते मिळत नाही. राशन कार्ड व धान्य मिळत नाही. वृद्ध, अपंग, निराधारांचे अर्ज मंजूर होत नाही. प्रत्येक कार्यालयात दलालांच्या मार्फत फसवणूक सुरू आहे. कर्मचारी वेळेवर भेटत नाही. त्यामुळे त्यांचे मुख्यालयी वास्तव्य सक्तीचे करा, ग्रामीण मुलांना निवासी उच्च दर्जाच्या शाळा सुरू करा, शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला भाव, जंगली जनावरांपासून सुरक्षा, जनावरांना धरणातून पिण्याचे पाणी सोडा, दिवसा वीजपुरवठा, भरमसाठ विजबिल, बेरोजगारांना मुद्रा लोन, अशा ज्वलंत मुद्यांसाठी आंदोलन करण्यात आले.तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित करा, घाटंजीत एसडीओ कार्यालय सुरू करा, घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार हामंद यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. शिबिराचे उद्घाटक राम नेवले व प्रमुख मार्गदर्शक पीबीआयचे राष्ट्रीय संयोजक आचार्य संतोषानंद अवधुत, प्रा. हरिशंकर मंडाले, डॉ. साहेबराव धोत्रे , अण्णाजी राजेधर, अरुण केदार, सुनील चोखारे, मुकेश मासूरकर, रंजना मामर्डे, माणिकदास टोंगे महाराज, घनश्याम पुरोहित, परेश कारिया, मनोज चौहान, अ‍ॅड. सिन्हा, दिलीप उमरे, विवेक डेहनकर, हरिभाऊ घोरदडे, मारोती येवले, सुनिल सरोदे, हरिभाऊ पेंदोर यांची उपस्थिती होती.सूत्रसंचालन मधुकर निस्ताने यांनी केले. प्रास्ताविक मोरेश्वर वातिले व आभार अमोल बाहेकर यांनी मानले. राजू विरदंडे, मोहन पवार, मधुसूदन मोहुर्ले, विमल राऊत, श्रीराम वाढई, गोपाल नामपेल्लीवार, रमेश सोळंके, अशोक जयस्वाल, श्रीराम मस्के, नरेंद्र धनरे, विभाश कोटनाके, प्रफुल्ल राऊत, रवी जाधव, संदीप मेश्राम, रवी दूधकोहळ, भीमराव सोयाम आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Morchaमोर्चाYavatmalयवतमाळ