शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वडार समाजाचा उमरखेडमध्ये मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:18 IST

लातूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथे अत्याचार करून वडार समाजातील तरुणीचा खून करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी वडार समाज संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडेंची उपस्थिती : टेंभूर्णी येथील अत्याचार, खून प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : लातूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथे अत्याचार करून वडार समाजातील तरुणीचा खून करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी वडार समाज संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकºयांना रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी मार्गदर्शन केले.टेंभूर्णी येथील महाविद्यालयीन तरूणी कोमल पवार हिचे २८ डिसेंबर रोजी अपहरण करून तिच्यावर अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली. याघटनेला १७ दिवस लोटले तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे वडार समाजात तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. आरोपीला तात्काळ अटक करावी यामागणीसाठी येथील वडार चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चा एसडीओ कार्यालयावर पोहल्यानंतर तेथे प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कोमल पवार खून्याना सरकार पकडत नाही. मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन नेटाने सुरू ठेवावे. त्यासाठी आपण पूर्णशक्तीनिशी वडार समाजाच्या पाठीेशी उभे राहणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार विजय खडसे, शिवाजी माने, डॉ. श्रावण रपणवाड, कैलास पवार, चंदू साकळकर, तातेराव हनवते, गणेश मेंढे, उत्तम जाधव, अमोल बाभुळकर, एमआयएमचे सैयद इरफान, ओंकार चव्हाण, रेखा गवळे, साहेबराव बेळे, भगवान बाभुळकर, शंकर पवार, विजय मेंढे, सुभाष बाभुळकर आदीसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.