शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

मित्र आले होते वाढदिवसाचा केक कापायला... मात्र केले एकमेकांवर चाकूचे वार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 18:32 IST

Yawatmal News बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरमध्ये शुकवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी तिघे मित्र एकत्रित आले होते. परंतु तिघांमध्ये अचानक बाचाबाची झाली आणि या मित्रांनी केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूने एकमेकांवर हल्ला चढविला.

ठळक मुद्देएकाच्या बोटावर तर दुसऱ्याच्या पोटावर घाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: अलीकडील काळात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचे फॅड भलतेच वाढले आहे. त्यानुसारच येथील बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरमध्ये शुकवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी तिघे मित्र एकत्रित आले होते. वाढदिवसानिमित्ताने केकसह इतर साहित्य सज्ज ठेवण्यात आले होते, परंतु किरकोळ कारणावरुन जमलेल्या तिघांमध्ये अचानक बाचाबाची झाली आणि काही क्षणातच या मित्रांनी केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूने एकमेकांवर हल्ला चढविला. या घटनेत एकाच्या दोन्ही बोटावर तर दुसऱ्याच्या पायावर आणि तिसऱ्याच्या पोटावर वार झाले. याप्रकरणी तिघांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला उपचारासाठी यवतमाळला हलविले आहे.  (Friends had come to cut the birthday cake ... but stabbed each other ..)बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरमध्ये हे तीन अल्पवयीन तरुण वाढदिवस साजरा करण्यासाठी शुकवारी रात्री नऊच्या सुमारास जमले होते. वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी आणलेल्या खाद्यपदार्थावर ताव मारत हे तिघेही गप्पा मारत होते. अचानक या तिघांत किरकोळ कारणावरुन बाचाबाची सुरु झाली आणि काही समजायच्या आतच एकाने वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रावर चाकूने हल्ला चढविला.

 

या घटनेत मित्राच्या दोन्ही हाताच्या बोटावर वार करण्यात आले. आपल्या मित्रावर चाकूने हल्ला होत असल्याने दुसरा मित्र त्याला वाचविण्यासाठी पुढे आला असता, संतापलेल्या पहिल्या मित्राने त्याच्या पायावर चाकूने हल्ला केला. यात तो जखमी झाला. यानंतर जखमी झालेल्या दोन्ही मित्रांनी मिळून हल्ला करणाऱ्या मित्राच्या हातातून चाकू हिसकावून घेत, त्याच चाकूने त्याच्यावर वार केले. यामध्ये त्याच्या पोट आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला यवतमाळ येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कळंब पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरुन तिघांवरही विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी