शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे विक्रीसाठी फ्रीज, सोन्यासह व्यापाऱ्यांना परदेश दौऱ्याचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

कापसाचे दर १४ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहे. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना हे दर पुढील वर्षीदेखील कायम राहतील, असा पोकळ आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याला २५ लाख कपाशी बियाण्यांचे पॅकेट लागणार आहे. त्यासाठी काही नामांकित कंपन्यांसह नवख्या कंपन्या बाजारात आल्या आहेत. या कंपन्यांच्या मुख्य विक्रेत्यांकडून कृषी सेवा केंद्र चालकांना छुप्या पद्धतीने पॅकेज दिले जात आहे. यामध्ये विदेश दौऱ्यासह देशातील धार्मिक स्थळांवर भेट घडवून आणण्याचे हे आमिष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील कृषी क्षेत्रामध्ये खरीप हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ही उलाढाल कॅश करण्यासाठी बियाणे कंपन्यांनी विक्रेत्यांना काश्मीरसह विदेश दौऱ्याचे पॅकेज जाहीर केले आहे. यासोबतच गत दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना या पॅकेजमधून मोठे आमिष दाखविल्याने  बाजारपेठेत शेतकऱ्यांना सतर्क राहून बियाण्यांची खरेदी करावी लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरिपाचा हंगाम कॅश करण्यासाठी १०० कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. त्यांनी गावपातळीवर पोस्टर युद्ध सुरू केले आहे. हे युद्ध इतके भयंकर आहे की, गावाचे बोर्ड आणि किलोमीटरचे दगड त्यांनी व्यापून टाकले आहे. एखाद्या निवडणुकीला शोभेल, असा प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे.यावर्षी कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कापसाचे दर १४ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहे. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना हे दर पुढील वर्षीदेखील कायम राहतील, असा पोकळ आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याला २५ लाख कपाशी बियाण्यांचे पॅकेट लागणार आहे. त्यासाठी काही नामांकित कंपन्यांसह नवख्या कंपन्या बाजारात आल्या आहेत. या कंपन्यांच्या मुख्य विक्रेत्यांकडून कृषी सेवा केंद्र चालकांना छुप्या पद्धतीने पॅकेज दिले जात आहे. यामध्ये विदेश दौऱ्यासह देशातील धार्मिक स्थळांवर भेट घडवून आणण्याचे हे आमिष आहे. याशिवाय पर्यटनासाठी काश्मीर या ठिकाणांचा समावेश आहे. यासोबतच काही ठराविक पॅकेट्स विकल्यानंतर टीव्ही, फ्रीज, सोनेदेखील कंपन्यांनी जाहीर केलेले आहे. प्रत्येक कंपन्यांचे विक्रेते आमचा कोटा पूर्ण केला तर ठराविक रक्कम गाठल्यानंतर हे पॅकेज देणार आहे. यामुळे विक्रेते ज्या ठिकाणावरून सर्वाधिक नफा होईल, अशाच कंपन्यांना शेतकऱ्यांच्या माथी मारण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध होण्याची नितांत गरज आहे. 

महाडीबीटी पोर्टलवर १४,७०० अर्ज-  येणाऱ्या हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बुधवारी २५ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. - त्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि कुठले बियाणे पाहिजे, याची माहिती ऑनलाईन भरायची आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १४ हजार ७०० अर्ज आले आहेत. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती