शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 6, 2014 22:56 IST

अतिरिक्त ठरलेल्या ९५० आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. आदिवासी अपर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार प्रवेशासह शिष्यवृत्ती, पुस्तके आणि प्रशिक्षणाचाही प्रश्न

आंदोलनाला यश : अपर आयुक्तांची हिरवी झेंडीयवतमाळ : अतिरिक्त ठरलेल्या ९५० आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. आदिवासी अपर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार प्रवेशासह शिष्यवृत्ती, पुस्तके आणि प्रशिक्षणाचाही प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली. जिल्ह्यात असलेल्या १९ वसतिगृहाची निवास क्षमता २३४५ विद्यार्थ्यांची आहे. या ठिकाणी २२३५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. यानंतरही एक हजारावर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलेल्या या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. शनिवारी प्रकल्प अधिकारी प्रशांत रुमाले यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. त्यांनी अमरावती अपर आयुक्तांशी संपर्क केला. त्यांनी ९५० विद्यार्थ्यांच्या वसतिगृह अतिरिक्त प्रवेशास मंजुरी दिली. ७५० विद्यार्थ्यांना यवतमाळात प्रवेश मिळणार आहे. राळेगाव, पुसद आणि दारव्हा तालुक्यातील वसतिगृहातही अतिरिक्त प्रवेशास मंजूरी देण्यात आली. यासोबत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, पुस्तके आणि विविध प्रशिक्षण या प्रश्नावरही लवकरच तोडगा काढला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुडमेथे, नागेश कुमरे, नीलेश पंधरे, सनी कुडमेथे, महेश गेडाम, कैलास वड्डे, मंगेश शेंडे, आशिष मडकाम आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विविध भागातून विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश मिळेल या आशेवर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. परंतु वसतिगृहात प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले होते. आता आयुक्तांनी प्रवेशाचा तिढा सोडविल्यामुळे त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. नवीन सत्र सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही पुस्तके मिळाली नाही. ही व्यवस्थाही तत्काळ करण्याची मागणी आहे. (शहर वार्ताहर)