शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:14 IST

यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांकरिता एका स्वतंत्र विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : पहिलाच प्रयोग, केंद्रावर सर्व यंत्रणा महिलांचीच

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांकरिता एका स्वतंत्र विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे.या मतदान केंद्रावर सर्वच महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे केंद्राचे वैशिष्ट्य राहणार आहे. या प्रयोगामुळे महिलांचा मतदानातील टक्का वाढतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिवसेंदिवस सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. त्यात महिलांचे मतदानाचे प्रमाण फार कमी असते. लोकशाही मार्गाने प्रस्थापित होणाऱ्या सरकारच्या निवड प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिक व महिलांनी मते नोंदवावी, लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, याकरिता निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या मार्गाने आवाहन केले. तसेच जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून यावेळी निवडणुकीत खास महिलांसाठी वेगळा प्रयोग केला जात आहे.महिला मतदान केंद्रामुळे महिलांना मतदान करणे सोयीचे होणार असून महिलांची मतदानातील टक्केवारी वाढेल, असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे मतदान केंद्र राहणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर तालुक्यातून एकाच मतदान केंद्राची निवड होईल.या प्रयोगामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढल्यास भविष्यात असे मतदान केंद्र वाढू शकतात. त्यामुळे या केंद्रावरील महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणे गरजेचे राहणार आहे.केंद्राची सुरक्षितता महत्त्वाचीमहिला मतदान केंद्र निवडताना महत्त्वाचे म्हणजे केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाºयांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड होईल, असे सांगितले जाते.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान