शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कामगारांचा ‘एसटी’तून मुक्त प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:22 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) सेवा देणाऱ्या खासगी कामगारांनी विनातिकीट प्रवासाचा सपाटा लावला आहे. महामंडळाच्या नियमांची या कामगारांनी ‘वाट’ लावली आहे.

ठळक मुद्देनियमांची ऐसीतैसी : विभागातील व्यवस्थापनाची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) सेवा देणाऱ्या खासगी कामगारांनी विनातिकीट प्रवासाचा सपाटा लावला आहे. महामंडळाच्या नियमांची या कामगारांनी ‘वाट’ लावली आहे. विभागातील व्यवस्थापनाचीही या प्रकाराकडे डोळेझाक सुरू आहे.महामंडळात खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगार कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आगारात आणि विभागात या कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक कामगार बाहेरगावाहून ये-जा करतात. प्रवासाकरिता ‘एसटी’ बसचा वापर करतात. तिकीट न काढता त्यांचा प्रवास सुरू आहे. महामंडळाकडून या कामगारांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही. महामंडळाच्या अधिकृत कामगारांशिवाय कुणालाही सवलती नाही. मात्र खासगी कामगारांनी नियमांची ऐशीतैशी केली आहे. ‘स्टाफ’च्या नावावर प्रामुख्याने काही सुरक्षा रक्षकांची दररोजची वारी सुरू आहे. खासगी कामगारांचा विनातिकीट प्रवास वाहकांसाठीही घातक ठरत आहे. बसच्या तपासणीत विनातिकीट प्रवासी आढळल्यास कारवाई केली जाते. काही प्रसंगी खासगी कर्मचारीच विनातिकीट सापडतो. अशाच प्रकारात काही महिन्यांपूर्वी यवतमाळ विभागात दोन वाहक कारवाईचे बळी ठरले होते. यानंतरही खासगी कामगारांच्या मुक्त प्रवासाला अटकाव केला जात नाही. सुरक्षा अधिकाºयांनाही कधी गरज वाटली नाही, असे दिसून येते. सुरक्षा रक्षकांची कामगिरी खरंच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आहे काय, असाही प्रश्न निर्माण होतो. यवतमाळ बसस्थानकात घडत असलेल्या विविध घटनांवरून याला बळ मिळते.शिकाऊ उमेदवारही ‘स्टाफ’‘एसटी’ महामंडळात विविध प्रवर्गात नवीन कामगारांची भरती झाली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. बहुतांश उमेदवार बाहेरगावचे आहेत. ते दररोज ये-जा करतात. यासाठी ‘लोकवाहिनी’चा वापर केला जातो. ‘स्टाफ’ असल्याचे सांगून त्यांचा प्रवास सुरू आहे. वास्तविक या उमेदवारांना विनातिकीट प्रवास करता येत नाही. मात्र सर्व काही सुरळीत सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी खटेश्वर येथून प्रवास करणाºया शिकाऊ उमेदवाराने वाहकाशी वाद घातला होता. त्याची तक्रार झाली होती. यावरून प्रशिक्षणार्थी उमेदवाराला दंड झाला होता. तिकीट काढून प्रवास करणाºया नागरिकांना जागा मिळत नाही. अशावेळी ‘स्टाफ’च्या नावाखाली विनातिकीट प्रवास करणाºयांनी जागा मोकळी करून देण्याचे सौजन्य दाखविण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ