शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

फुकटातील जेवण आता हाेणार बंद, द्यावे लागणार ५ रूपये; वर्षभरात तब्बल ३१ कोटी थाळ्या फस्त

By अविनाश साबापुरे | Updated: June 30, 2023 10:28 IST

Yavatmal: सरसकट बांधकाम कामगारांना रोजमजुरीसोबतच मोफत जेवण देण्याचीही योजना गेल्या वर्षभरापासून राज्यात सुरू आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ - सरसकट बांधकाम कामगारांना रोजमजुरीसोबतच मोफत जेवण देण्याचीही योजना गेल्या वर्षभरापासून राज्यात सुरू आहे. वर्षभरात तब्बल ३१ कोटी ७४ लाखांपेक्षा अधिक मोफत थाळ्या वाटप झाल्याची आकडेवारी आरटीआय कार्यकर्ते विशाल ठाकरे यांनी केलेल्या माहिती अधिकारातून पुढे आली. आता १ जुलैपासून केवळ नोंदणीकृत कामगारांनाच जेवण दिले जाणार असून, त्यासाठी पाच रुपये शुल्क घेतले जाणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना मध्यान्ह भोजन वितरित करण्याची योजना राबविली जात आहे. परंतु, अनेक ठिकाणी यात कामगारांच्या नावावर भलतेच लोक जेवण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत मंडळाच्या सचिवांनी शासनाशी पत्रव्यवहार करून योजनेत काही बदल प्रस्तावित केले होते. 

आता केवळ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या व सक्रिय (जीवित) असलेल्या कामगारांनाच पाच रुपयांत  मध्यान्ह भोजन वितरित करण्याचे निर्देश राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिले आहेत.

वर्षभरात मोफत वाटप झालेल्या थाळ्यांचा तपशील    मुंबई शहर    १,०६,८७,४९०    मुंबई पश्चिम     ५६,२०,७८२    मुंबई पूर्व     ५१,२९,०५४    नवी मुंबई     १४,९६,२३८    ठाणे     ५३,३०,००४    कल्याण     २४,२९,००७    रायगड     ४८,२५,४३६    पालघर    ८,५३,४८०    पुणे    २,१०,८७,५१९    सोलापूर    २,१३,१०,६०१     बार्शी    १८,८५,६५४    कोल्हापूर    २,१५,५६,०५३     सांगली    ४४,६३,७२७     सातारा    ३२,८२,६९४     इचलकरंजी    १,८१,८९,०४३     संभाजीनगर    १,००,८२,१३४     लातूर    ९९,१२,०११     बीड    ६५,४२,१८०     जालना    १,९९,६२,९२५     परभणी    ५७,७५,७७२     हिंगोली    ७५,३२,४९३     नांदेड    ३२,७५,७८८     धाराशिव    ७५,२७,११०     नागपूर    २,६१,६८,६८२     वर्धा    २५,०५,५२३     भंडारा    ४८,६८,२०४     गडचिरोली    ५०,२८,३१०     चंद्रपूर    ३,५२,९५,०४२     अकोला    ६३,१३,७९७     अमरावती    ७९,६६,२८२     वाशिम    १३,११,४५२     यवतमाळ    ३१,८२,११५     बुलडाणा    १,६९,२९,०२०     नाशिक    ६३,२०,७३७     अहमदनगर    २७,५३,७४५    एकूण    १,७४,००,१०४

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र