शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व वाटा मोकळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

प्रतिबंधित क्षेत्रातून कुणीही बाहेर पडणार नाही आणि कुणीही आत येणार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र बॅरिकेटींग केल्यानंतरही आणि पोलिसांचा पहारा असतानाही या क्षेत्रात बिनधास्त प्रवेश मिळत आहे. तसेच या परिसरातून अनेक नागरिक निवांतपणे बाहेर पडताना दिसून येत आहे. ‘लोकमत’ने शनिवारी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून ही बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाची धास्ती नाहीच : दररोज निवांत गप्पा, नागरिकांच्या मुक्त विहाराने कोरोना पसरण्याचा धोका, प्रशासन गाफिल

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तूर्तास हा आकडा एक हजार ११५ वर पोहोचला. यावर मात करण्यासाठी यवतमाळसह जिल्ह्यात प्रतिबंधित (कन्टोंमेन्ट) क्षेत्र तयार केले जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रातून कुणीही बाहेर पडणार नाही आणि कुणीही आत येणार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र बॅरिकेटींग केल्यानंतरही आणि पोलिसांचा पहारा असतानाही या क्षेत्रात बिनधास्त प्रवेश मिळत आहे. तसेच या परिसरातून अनेक नागरिक निवांतपणे बाहेर पडताना दिसून येत आहे. ‘लोकमत’ने शनिवारी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून ही बाब उघडकीस आली आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत ९० प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहे. यवतमाळ शहरात असे १० क्षेत्र आहे. पूर्वीच्या तुलनेत या क्षेत्राचा आकार एकदम लहान करण्यात आला. मात्र या भागातून अनेक व्यक्ती रात्री आणि दुपारच्या सुमारास बाहेर पडत असल्याचे दिसून आले. अनेक नागरिक प्रंतिबंधित क्षेत्रातून वाहनाचा वापर करून बाजारात शिरतात. दैनदिन वस्तूंची खरेदी करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार थांबण्याऐवजी वाढण्याचा धोका वाढला आहे. याला काही व्यक्ती अपवाद आहे. मात्र प्रत्येक जण नियमांचे पालन करीत नाही. अनेकांना कोरानाचे गांभीर्य नाही. ते बिनधास्त विना मास्क आणि विना सोशल डिस्टन्स वावरताना दिसतात.शनिवारी लक्ष्मीनगर परिसर प्रतिबंधित करण्यात आला. हा परिसर प्रशासनाने सील केला. यात एक बोळ सील करण्यात आली. त्यात ही गल्ली एका बाजूने बांबूंनी सीलबंद करण्यात आली. तर दुसऱ्या बाजूने पूूर्णत: खुली आहे. त्याला गेटच नसल्याने कुणीही बिनधास्त या क्षेत्रात जाऊ शकतात व तेथून बाहेर पडू शकतात. या भागात प्रवेश केला त्यावेळी एक व्यक्ती खुल्या बाजूने बाहेर आला. त्याने प्लास्टीक पाईपचा गुंडाळा दुसºया व्यक्तीच्या स्वाधीन केला. पाईप देताना हातावर केवळ सॅनिटायझर टाकले. प्रतिबंधित क्षेत्रातून आलेला रबरी पाईप दुसरीकडे नेण्यात आला. दुसºया बाजूला काही महिला बाहेर आल्या होत्या. त्या निवांत गप्पा करीत होत्या. विशेष म्हणजे शनिवारी तेथे एकही पोलीस आढळला नाही.दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंट प्रंतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या ठिकाणी तीन इमारती आहेत. त्या बाहेर बांबू बांधण्यात आले. या परिसरात बाहेर दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी होती. ही ईमारत एका बाजूने अडविण्यात आली. दुसरीकडून बॅरिकेटस काढले होते. तेथे तैनात पोलीस कर्मचारी जेवणासाठी गेल्याचे सांगण्यात आले. काही वेळाने या इमारातीमधील एक व्यक्ती दुचाकीने बाहेरही गेल्याचे दिसून आले.रंभाजीनगर, संभाजीनगरमधील गजानननगरात एका बाजूने बॅरिकेटस लावण्यात आले होते. दुसरीकडून रस्ता खुला होता. त्याच्या बाहेर दोन पोलीस तैनात होते. या परिसरातील व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राबाहेर उभा होता. तो ये-जा करणाऱ्यांचे निरीक्षण करीत होता. नेमके कशाचे निरिक्षण सुरू होते याबद्दल साशंकताच आहे.फळ विक्रेत्यांना खुली सूटपोलीस मित्र कॉलनीला लागूनच साईनगरी आहे. या भागात काही घरालाच बॅरिकेटींग करण्यात आले. यातही एक फळ विक्रेता दुचाकीने या प्रतिबंधित क्षेत्रात शिरला. त्याने या भागात आतमध्ये फळे पाठविली. समोरूनही सॅनीटायझर घेऊन एक युवक आला. त्याने फळे घरात नेली. विशेष म्हणजे या ठिकाणी पोलीस सावलीत झाडाखाली मोबाईलवर सर्च करीत निवांतपणे आपली ड्युटी बजावत असल्याचे दिसले.कळंब चौकात खुलेआम वावरकळंब चौकात एकदम विदारक चित्र पहायला मिळाले. या ठिकाणी पोलिसांची व्हॅन आणि पोलिसही कर्तव्यावर होते. मात्र तरीही प्रतिबंधित क्षेत्रातून खुलेआम नागरिक दुचाकीने बाहेर पडत होते. अनेक नागरिक आतही जात होते. यामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे नेमके काय, हेच कळेनासे झाले होते. एकूणच या संपूर्ण परिस्थितीने कोरोनाची कुणालाही धास्ती वाटत नसल्याचे दिसून आले. सर्वच बिनधास्त असल्याचे आढळले.

महिलांच्या निवांत गप्पा सुरूचतारपुरा परिसरात सहा बोळींना बॅरिकेटस लावून बंद करण्यात आले आहे. मात्र एका बाजूने बॅरिकेटस उघडे आढळले. त्याच्याबाहेर महिलांचा मोठा समूह दुपारी हाकत होता. बंदीस्त भागातील महिलांना काही महिला बोलताना आढळल्या. या महिलांच्या वागण्यातून कुठेही हा पसिर प्रतिबंधित असल्याचे दिसून आले नाही. त्या नेहमीप्रमाणेच गप्पांमध्ये मश्गूल होत्या. या परिसरात नागरिकांच्या सुविधेसाठी दवाखान्याची व्यवस्था केली आहे. तेथील कर्मचारी मात्र प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून आले. तेथे दोन पोलीस तैनात होते.

केवळ अधिकाऱ्यांसमोर योग्य वागणूकअधिकारी आणि पोलीस आले की आत दडायचे आणि त्यांचे वाहन गेले की पुन्हा बाहेर पडायचे, असा प्रकार सर्वत्र सुरू आहे. नागरिकांना कोरोनाची थोडीही धास्ती नाही. ते अगदी बिनधास्त वागत आहे. यातून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याऐवजी जिल्ह्यात कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या