शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात सौर दिव्यांच्या खरेदीत गडबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 12:27 IST

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी थेट गुजरातमधील केंद्रीय भांडाराच्या दर पत्राचा आधार घेत लाखो रूपयांचे सौर पथदिवे खरेदी करण्यात आले.

ठळक मुद्देगुजरातच्या केंद्रीय भांडाराच्या पत्राचा आधारमलिदा लाटल्याचा आरोप

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी थेट गुजरातमधील केंद्रीय भांडाराच्या दर पत्राचा आधार घेत लाखो रूपयांचे सौर पथदिवे खरेदी करण्यात आले. ही खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून संबंधित गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी यात मलिदा लाटल्याचे उघडकीस येत आहे.पुसद पंचायत समितीमार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध वस्तींमध्ये लावण्यासाठी सौर पथदिवे खरेदी करण्यात आले. ही खरेदी शासनाच्या नियमानुसार केली नसल्याचा आक्षेप खुद्द जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर यांनी घेतला होता. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. समाजकल्याण विभागाने या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पुसदच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी आत्तापर्यंत दोन अहवाल सादर केले. मात्र हे दोनही अहवाल परस्परविरोधी असल्याचे खुद्द समाज कल्याण अधिकाऱ्यांनीच कबूल केले. नंतर या प्रकरणाची सीईओंपुढे सुनावणी झाली. मात्र अद्याप त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.पुसद पंचायत समितीप्रमाणेच जिल्ह्यातील इतर पंचायत समितींमार्फत लाखोंच्या सौर पथदिव्यांची खरेदी करण्यात आली. यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, दिग्रस आदी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आता लाखोंचे सौर पथदिवे (एलईडी) लावण्यात आले. शासन नियमानुसार तीन लाखांवरील खरेदी ई-निविदा पद्धतीने करावी लागते. तसेच दर करार पद्धत बंद झाली आहे. मात्र संबंधित गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी चक्क केंद्रीय भांडार विभागाचे पत्र जोडून लाखोंच्या पथदिव्यांची खरेदी केल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेने या प्रकरणाची कसून चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.जादा दराने केली खरेदी४सौर पथदिव्यांच्या खरेदीसाठी बीडीओ आणि ग्रामसेवकांनी चक्क गुजरातमधील केंद्रीय भांडार विभागाच्या दर कराचे पत्र जोडले. वास्तविक दर करार पद्धत राज्य शासनाने बंद केली. मात्र ग्रामसेवकांनी अत्यंत चलाखीने हे पत्र जोडून लाईटची खरेदी केली. तीसुद्धा जादा दराने. यातून संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी लाखोंचा मलिदा लाटल्याचे उघड होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा