शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

चार महिन्यात तब्बल ११० अभ्यास समित्या, युती सरकारचा टाईमपास

By admin | Updated: April 24, 2017 18:58 IST

गेल्या चार महिन्यात भाजपा-शिवसेना युती सरकारने विविध मुद्यांवर अभ्यास करण्यासाठी तब्बल ११० समित्या गठित केल्या

राजेश निस्ताने/ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 24 - गेल्या चार महिन्यात भाजपा-शिवसेना युती सरकारने विविध मुद्यांवर अभ्यास करण्यासाठी तब्बल ११० समित्या गठित केल्या आहेत. या माध्यमातून टाईमपास केला जात असल्याची ओरड आहे. कोणत्याही विषयावर अभ्यास करण्याच्या या पद्धतीवर  हे सरकार आहे की विद्यार्थी ? असा सवाल विरोधक उपस्थित करीत आहेत.राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या काळात जनहिताच्या घेतलेल्या निर्णयांवर नजर टाकली असता सरकारने बहुतांश विषयात अभ्यासासाठी समित्या गठित केल्या आहेत. या माध्यमातून सरकार टाईमपास करीत असल्याची टीका विरोधी पक्षांमधून ऐकायला मिळते. अनेक गाजलेल्या प्रकरणांमध्येही अभ्यास समिती गठित करून सरकारने वेळ मारुन नेल्याची उदाहरणे आहेत.

एका दिवशी एक समिती३१ डिसेंबर २०१६ ते २० एप्रिल २०१७ या चार महिन्यातील युती सरकारने तब्बल ११० अभ्यास समित्या गठित केल्या आहेत. या चार महिन्यात सुट्या वगळता ८३ दिवस काम झाले. त्यात ११० समित्या स्थापन केल्या गेल्या. अर्थात दरदिवशी एकापेक्षा अधिक समित्या स्थापन झाल्या. कुठे सचिव, कुठे पालकमंत्री तर कुठे जिल्हाधिकारी या समित्यांचे अध्यक्ष आहेत. अनेक प्रकरणात मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली गेली. या समित्यांना अहवालासाठी कुठे एक महिना तर कुठे तीन महिने दिले गेले. विहित मुदतीत अहवाल आला नाही म्हणून सर्रास मुदतवाढही दिली गेली. कुणी आपल्या विषयाचे काय झाले अशी विचारणा केल्यास समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, एवढेच उत्तर सरकारदरबारी दिले जात आहे. एकूणच समित्या निर्माण करून जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू आहे. युती सरकार स्थापनेपासून पहिल्या दोन वर्षातील कार्यकाळाची तपासणी केल्यास अभ्यास समित्यांचा हा आकडा आणखी किती तरी मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉग़्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात समित्या निर्माण केल्या गेल्याची नोंद नाही.  अशा आहेत समित्या

 काही समित्यांना चौकशीची, काहींना सल्लागाराची तर काहींना उपाययोजना सूचविण्याची जबाबदारी सोपविली गेली. या समित्यांचे प्रशासकीय निर्णय, परीक्षण, उत्पन्न वाढ, उपाययोजना, धोरणात्मक निर्णय, आढावा, सनियंत्रण, मसुदा, निधी, पारदर्शकता, उत्तरदायित्व, कार्यक्षमता, कार्यक्रम, प्रतिष्ठान, पुनर्विलोकन, अंमलबजावणी, समन्वय, निरीक्षण, छाननी, खररेदी, कायदा, प्रतिनियुक्ती, कर्तव्य व जबाबदाऱ्या, अधिकार प्रदान, शुल्क निर्धारण, हस्तपुस्तिका, बरखास्ती, वितरण सुधारणा, व्यवस्थापन, स्मारक, समस्या निवारण आदी नामकरण केले गेले आहे.  

कुत्र्यांच्या समस्यांकरिताही समिती !११० समित्यांपैकी अनेक समित्या अनावश्यक व अतिशय क्षुल्लक कारणासाठी स्थापन केल्या गेल्याचे आढळून आले. त्यातील काही समित्या तर हास्यास्पद आहेत. कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या समस्यांकरिता २ मार्च २०१७ रोजी चक्क राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. अशा आणखी काही समित्या आहेत.