शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

एसटीचे चार कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: January 17, 2015 00:12 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकावरील कारवाई टाळण्यासाठी १५ हजाराची लाच घेताना एसटी महामंडळाच्या भरारी पथकातील तीन वाहतूक निरीक्षकासह...

 यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकावरील कारवाई टाळण्यासाठी १५ हजाराची लाच घेताना एसटी महामंडळाच्या भरारी पथकातील तीन वाहतूक निरीक्षकासह एक चालक लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई महागाव तालुक्यातील दहीसावळी येथे शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. अशोक किसनराव अघडते, मेहबूब खान बाबर खान, माणिक लक्ष्मण माने असे लाच घेताना अटक केलेल्या सहायक वाहतूक निरीक्षकांची तर विठ्ठल पांडुरंग बहाड असे चालकाचे नाव आहे. हे चौघेही अकोला येथील रहिवासी आहे. गुरुवारी रात्री एक वाहक राळेगाव-चंद्रपूर ही नियमित बसफेरी घेऊन जात होता. दरम्यान भरारी पथकाने ही बस थांबवून तपासणी केली. त्यामध्ये दोन प्रवासी विना तिकीट आढळून आले. यावेळी पथकातील चौघांनी याचा अहवाल वरिष्ठांना पाठवित नाही तसेच प्रकरणाचा निपटारा करून देतो, असे सांगून २० हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर वाहकाने शुक्रवारी सकाळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी शासकीय पंचाकरवी लाचेच्या मागणीची सत्यता पडताळली. त्यानंतर पथक आणि वाहकात प्रकरण निपटविण्यासाठी १५ हजारांचा व्यवहार ठरला. तसेच ही रक्कम महागाव तालुक्यातील धनोडा येथे घेऊन येण्यास सदर वाहकाला पथकाने सांगितले. ठरल्याप्रमाणे वाहक रक्कम घेऊन गेला. यावेळी पथकाच्या सुमो वाहनात वाहकाला बसवून पथकाने दोन किमी अंतरावरील दहीसावळी येथे नेले. लाचेची रक्कम स्वीकारून अहवालात फेरफार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी वाहकाने लघुशंकेचा बहाणा करून वाहनातून पाय काढला. इशारा देताच दबा धरुन बसलेल्या लाचलुचपतच्या पथकाने त्यांना रकमेसह रंगेहात अटक केली. तसेच एसटीचे सुमो वाहन (एम.एच.०६/एएल-३६७) ताब्यात घेतले. कारवाईत एसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, कर्मचारी अरुण गिरी, नरेंद्र इंगाले, प्रकाश शेंडे, शैलेश ढोणे, अमोल महल्ले, अमित जोशी, अनिल राजकुमार, नीलेश पखाले, गजानन राठोड, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर, सुधाकर कोकेवार, विशाल धलवार यांनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)