शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

प्राथमिक शाळेतच पाया मजबूत व्हावा- माधुरी आडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 05:15 IST

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनी १२०० विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

यवतमाळ : मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या असीम त्यागामुळेच बाबूजींना देशसेवा करता आली. आज त्यांच्या मुलांनी यवतमाळपासून दिल्लीपर्यंत लौकिक वाढविला. विविध क्षेत्रात यशस्वी होऊनही सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दर्डा परिवाराचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्राथमिक शाळेतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे. ही जाणीव ठेवूनच लोकमत परिवाराने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे यांनी केले.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या सहचारिणी वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गुरुवारी नगर परिषदेच्या सर्व शाळांमधील तब्बल १२०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. लोकमत परिवार आणि जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्या वतीने येथील मातोश्री दर्डा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा होते.प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे एडिटर-इन-चीफ तथा राज्याचेमाजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, नगर परिषद शिक्षणसभापती नीता केळापुरे, उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्निल तांगडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिलकुमार अढागळे, नगर परिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी सुसंस्कृतही व्हावे - विजय दर्डामाजी खासदार विजय दर्डा म्हणाले, आम्ही नगर परिषद शाळेच्या संस्कारांतूनच घडलो. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची जाणीवही आहे. अशा शाळांसाठी काही तरी केले पाहिजे, या जाणिवेतूनच आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम घेतला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सुसंस्कृतही झाले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली पाहिजे.आईचा आदर ठेवला पाहिजे - राजेंद्र दर्डामाजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असतो. ज्यांना आई असते ते भाग्यवान असतात. मुलांनी आईचा नेहमी आदर ठेवला पाहिजे, तरच मुले मोठी झाल्यावर जग त्यांचा आदर करते.आई ही संस्काराची जननी- कांचन चौधरीवीणादेवी दर्डा यांनी आपल्या मुलांना संस्काराची शिदोरी दिली आहे. विजयबाबू यांनी खासदार असताना यवतमाळ नगर परिषदेला मोठा निधी दिला होता. आजवर तेवढा निधी कुणीही दिलेला नाही. परंतु, नगर परिषदेच्या सर्व शाळांची अवस्था सुधारावी यासाठी त्यांनी योगदान द्यावे, असे नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी सांगितले. यावर विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांनी लगेच शाळांची पाहणी करून पुढील निर्णय घेऊ, असा शब्द दिला.आईच्या संस्कारांचे मनोज्ञ ‘शेअरिंग’नगर परिषद शाळांमधील १२०० विद्यार्थ्यांसोबत माजी खासदार विजय दर्डा आणि माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी अत्यंत मनमोकळा संवाद साधला. शिकण्यासाठी प्रोत्साहित करताना या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या. आई संस्कारांची शिदोरी असते. आई आपल्यासाठी किती मेहनत घेते, आपल्या वर्तनातून कशी संस्कार करते हे सांगताना त्यांनी मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या जीवनातील उदाहरणे मुलांना सांगितली.

 

टॅग्स :Rajendra Dardaराजेंद्र दर्डाVijay Dardaविजय दर्डाYavatmalयवतमाळ