शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाने केला नेमप्लेटवर अशोक स्तंभ अंकित; यवतमाळात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:21 IST

आपल्या घराच्या नेमप्लेटवर राजमुद्रा अंकित करून महाराष्ट्र शासन असे लिहिणाऱ्या येथील माजी सैनिक असलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध यवतमाळच्या लोहारा ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

ठळक मुद्देविशेष कार्यकारी अधिकारीपदाचा गैरवापर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपल्या घराच्या नेमप्लेटवर राजमुद्रा अंकित करून महाराष्ट्र शासन असे लिहिणाऱ्या येथील माजी सैनिक असलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध यवतमाळच्या लोहारा ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीची लोहारा पोलिसांनी चौकशी सुरू केली असून त्या कार्यकारी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.विनोद लक्ष्मण आरेवार रा. रेणुकानगरी वाघापूर (यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. ते माजी सैनिक असल्याचे त्यांच्या घराच्या नेमप्लेटवरच लिहिलेले आहे. भारतीय राजमुद्रेचा वापर करून त्यांनी आपल्या घराच्या दर्शनी भागावर नेमप्लेट लावली आहे. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील रवींद्र बाबाराव मानकर यांनी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी आरेवार यांच्याकडून राजमुद्रेचा गैरवापर होत असल्याचे नमूद केले. तक्रारीसोबत घराच्या नेमप्लेटचे छायाचित्रही जोडले आहे. यावरून लोहाराच्या ठाणेदार शीतल मालटे यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यावरून एक पोलीस पथक रेणुकानगरीत मंगळवारी दुपारी धडकले. त्यांनी याची रितसर चौकशी करून आरेवार यांच्या विरोधात भारतीय राजमुद्रा वापर व प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Crimeगुन्हा