शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

माजी मुख्याध्यापक व कुख्यात गुंडाचा खून

By admin | Updated: September 28, 2015 02:41 IST

संपूर्ण शहर गणेश विसर्जनाच्या तयारीत असताना शहरात खुनाच्या दोन घटनांनी एकच खळबळ उडाली.

यवतमाळ : संपूर्ण शहर गणेश विसर्जनाच्या तयारीत असताना शहरात खुनाच्या दोन घटनांनी एकच खळबळ उडाली. दारव्हा मार्गावरील राऊतनगर परिसरातील सुखकर्तानगरीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा तर आर्णी मार्गावरील तुळजाईनगरीत कुख्यात गुंडाचा खून झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. राऊतनगरातील घटनेत सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या पत्नीसह तिघांंना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर गुंडाच्या खून प्रकरणात तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील दारव्हा मार्गावरील सुखकर्तानगरीतील रहिवासी खुशाल नामदेवराव जतकर (६४) असे खून झालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे नाव आहे. रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला खून झाल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने दिली. त्यावरून पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. खुशाल जतकर रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्रावस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसत होते. तसेच गुप्तांगालाही वायरने आवळल्याचे दिसून आले. याशिवाय घरातील रक्ताचे डाग फिनाईलच्या मदतीने पुसल्याचे दिसत होते. घटनास्थळावरून पोलिसांनी विविध वस्तू ताब्यात घेतल्या. दरम्यान खुशालची पत्नी सुरेखा जतकर (४५) ही घरात रडत होती. पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात संशयित आणखी तिघांच्या मागावर पोलीस आहे. कौटुंबिक कलहातून हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत पोलिसांना आढळून आले. दरम्यान या घटनेची माहिती होताच जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहरचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी, एसपींचे वाचक फौजदार पंत यांनी घटनास्थळाला भेट दिली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वत: या घटनेची बारकाईने पाहणी करून पोलिसांना तपासाच्या टिप्स् दिल्या. सलमान महंमद सोलंकी (२७) रा. तारपुरा असे आर्णी मार्गावरील तुळजाईनगरातील घटनेतील मृताचे नाव आहे. आर्णी मार्गावरील तुळजाईनगरी येथील भाड्याच्या घरात सलमानच्या सहकाऱ्यांकडूनच त्याचा खून करण्यात आला. वर्चस्वाच्या वादातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येते. यातील आरोपी सोनू ऊर्फ सुजित ठाकूर (१९), गुड्डू पिसे (२०), अभिजित मुनेश्वर (२०) सर्व रा. तारपुरा या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानने सोनू ऊर्फ सुजित ठाकूर याच्या वडिलांना मारण्याची धमकी दिली होती. याचा काटा काढण्यासाठी सोनुने सलमान सोबत मैत्री केली. शनिवारी रात्री या सर्वांनी येथच्छ मद्यप्राशन केले होते. त्यानंतर झोपण्यासाठी हे तुळजाईनगरी येथे नरेंद्र बिसन उज्जैनवार यांच्याकडून भाड्याने घेतलेल्या घरी गेले. उज्जैनवार यांचे घर संशयित सागर दुधे, आशुतोष भोयर, अमोल मायंदे यांनी भाड्याने घेतले होते. तेथेच सलमान व त्याचे सहकारी रात्री झोपले. पहाटे ४ वाजताच्या सुमारास आरोपी सोनूने सलमानला दगडाने ठेचून मारले. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची सोनू ऊर्फ सुजित ठाकूर याने पोलिसांपुढे कबुली दिली. शिवाय या घटनेतील संशयित मनू जयस्वाल, अमोल मायंदे, सागर दुधे, आशुतोष भोयर यांनाही ताब्यात घेतल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी सांगितले. या प्रकरणी घरमालक नरेंद्र बिसन उज्जैनवार (३५) रा. शिवाजीनगर यांच्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास वडगाव रोडचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)कौटुंबिक कलहाचा संशय खुशाल जतकर हा कळंब येथील चिंतामणी विद्यालयाचा मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाला होता. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असून तिच्यापासून एक मुलगा आहे तर काही वर्षापूर्वी सुरेखासोबत लग्न केले होते तिच्यापासूनही एक मुलगा आहे. या प्रकरणी खुशालचा लहान मुलगा अमित जतकर (२०) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. कौटुंबिक कलहातून हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसात तपासात उघड झाले आहे. दरम्यान घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात व्यस्त असलेल्या यवतमाळ पोलिसांना रविवारी दोन खुनांचा तपास करण्याचे आव्हान उभे ठाकले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या पाच तासात दोनही खुनांचा छडा लावून एका प्रकरणात तिघांना अटक तर दुसऱ्या प्रकरणात पत्नीसह तिघांना संशयावरून ताब्यात घेतले. वडगाव रोड आणि शहर पोलीस ठाण्यातील या दोनही घटना अवघ्या काही तासातच उघडकीस आल्या. दोन्ही ठाण्यातील शोध पथक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे शोध पथक यांच्या संघिक प्रयत्नातून आरोपी टप्यात आले.