शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम आरक्षणासाठी जमीयतचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:25 IST

मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे येथील तिरंगा चौकात धरणे देण्यात आले. राज्य सरकारने तातडीने रद्द केलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे येथील तिरंगा चौकात धरणे देण्यात आले. राज्य सरकारने तातडीने रद्द केलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.मुस्लीम समाजाला आरक्षणाबाबत राज्य सरकार कुठलीही भूमिका स्पष्ट करत नसल्याचा आरोप जमियतचे जिल्हा सचिव मुफ्ती एजाज यांनी यावेळी केला. शिक्षण, आर्थिक, सामाजिक व देशाच्या मुख्य प्रवाहात आणून मुस्लीम समाजासाठी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली.जस्टीस राजेंद्र सच्चर आयोग, महेमुदुर रहमान कमिटी, रंगनाथन मिश्रा आयोग आदींनी मुस्लीम समाजासाठी आरक्षण लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. तरीही या समाजाला आरक्षण लागू होत नाही, ही शोकांतिका असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.धरणे कार्यक्रमात मौलवी याकुब, मौलवी शारिक, मौलवी फजलुर्रहमान, हाफिज जुबेर, जिया मिनाई, अ‍ॅड. जयसिंग चव्हान, एमपीजेचे प्रा. सय्यद मोहसीन, अ‍ॅड. इम्रान देशमुख, डॉ. इर्शाद खान, जमील पटेल, जमियतचे शहर सचिव वसीम खान आदी सहभागी झाले होते. धरणे आंदोलनानंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

टॅग्स :Muslimमुस्लीमreservationआरक्षण