शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

धुरा पेटविणाऱ्या तीन शेतकऱ्यांवर वन गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:00 IST

तालुक्यातील आजंती खाकी येथील तीन शेतकऱ्यांना धुरा पेटविणे महागात पडले आहे. वन विभागाच्या अधिनियमानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देनेर तालुका : भारतीय वन अधिनियमानुसार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील आजंती खाकी येथील तीन शेतकऱ्यांना धुरा पेटविणे महागात पडले आहे. वन विभागाच्या अधिनियमानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.आजंती खाकी शिवारातील शेतकºयांनी सोमवारी धुरा पेटविला होता. यामुळे लगतच्या उपवनाला आग लागून मोठी वनसंपदा नष्ट झाली. शेतकºयांनी निष्काळीपणे धुरा पेटविल्याने ही आग लागली.वनातील गवतासह इतर वनसंपदा आणि रोपटी या आगीत जळून खाक झाली. वन विभागाच्या आग नियंत्रण पथकाने ही आग आटोक्यात आणली. नेर-कारंजा रोडवरील आजंती वन परिक्षेत्रातील या घटनेने वन विभागाचे नुकसान झाले. दारव्हाचे उपविभागीय वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. मकरंद गुर्जर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तत्पूर्वी वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड व त्यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण प्राप्त केले होते.वनपाल अनिल शिरभाते, बी.एम. नांदणे, वैशाली चिलनकार, सपना राठोड, अशोक कदम आदींनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेबाबत वन विभागाने शेतकरी गजानन चव्हाण, प्रताप चव्हाण व इतर एकाविरुद्ध वन अधिनियम १९२७ चे कलम २६/१ (ब) नुसार गुन्हा दाखल केला. तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड यांनी सांगितले.धुरे पेटविणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याचे वनाधिकारी डॉ. मकरंद गुर्जर यांनी सांगितले. वनालगतचे धुरे पेटविण्यापूर्वी शेतकºयांनी वन विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. गुर्जर यांनी स्पष्ट केले.