शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन बियाणे खतावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

वागदा परिसरातील शेतकऱ्यांनी पोर्टलवरून ऑनलाइन बियाणे, खत, कीटकनाशके बुक केले. नागपूर येथील एका गोडावूनमधून कुरिअरच्या माध्यमाने हा माल गुरुवारी सायंकाळी वागदा गावात पोहोचला. हे बियाणे शेतकऱ्यांच्या ताब्यात जाण्यापूर्वीच कृषी विभागाला याचा सुगावा लागला. सतर्क असलेले कृषी सहायक सचिन वाघमारे यांनी सदर मुद्देमाल घेऊन आलेल्या कुरिअरच्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले व याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : शेतकरी आता बियाणे, खत व कीटकनाशके हेही ऑनलाइन बोलविण्याच्या तयारीत आहे. स्थानिक कृषी केंद्रांपेक्षा कमी दरात हे मिळत असल्याने ऑनलाइन खरेदीचा पर्याय वापरला. मात्र, वागदा येथे प्रतिबंधित बियाणे, रासायनिक खत व कीटकनाशक आल्याने त्यावर कृषी विभागाने कारवाई केली. तब्बल पावणेतीन लाखांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला. वागदा परिसरातील शेतकऱ्यांनी पोर्टलवरून ऑनलाइन बियाणे, खत, कीटकनाशके बुक केले. नागपूर येथील एका गोडावूनमधून कुरिअरच्या माध्यमाने हा माल गुरुवारी सायंकाळी वागदा गावात पोहोचला. हे बियाणे शेतकऱ्यांच्या ताब्यात जाण्यापूर्वीच कृषी विभागाला याचा सुगावा लागला. सतर्क असलेले कृषी सहायक सचिन वाघमारे यांनी सदर मुद्देमाल घेऊन आलेल्या कुरिअरच्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले व याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पांडुरंग फाळके हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बियाणे व कीटकनाशक याचा परवाना आहे की नाही, याची शहानिशा केली. नंतर पंचनामा करून हे बियाणे वडगाव जंगल पोलीस ठाण्यात आणले. तेथे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कुरिअर गोडावून कीपर महेश विभीषण पाटील याच्याविरुद्ध कृषी कायद्यांतर्गत विविध कलमानुसार, तसेच भादंवि कलम ४२०, ४६५ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार पवन राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 

कापूस व तुरीच्या १०३ बॅग- वागदा येथील शेतकऱ्याने ऑनलाईन बियाणे खरेदी करताना कापसाच्या १०० बॅग, तुरीच्या तीन बॅग, कीटकनाशकाचे २२ डबे तर रासायनिक खताच्या (पाच किलो) ७० बॅग बोलाविल्या होत्या. हा माल शेतकऱ्याच्या  हाती लागण्यापूर्वी कुरिअर बॉयजवळून कृषी विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला.

ऑनलाइन बियाणे  खरेदी पहिल्यांदाच उघड - शेतकऱ्यांकडून ऑनलाइन खत, कीटकनाशक बियाणे खरेदी केले जात असल्याचा प्रकार पहिल्यांदाच उघड झाला आहे. या ऑनलाइन बियाणे खरेदीत विश्वासार्हता काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून फसविण्याचा प्रकार सुरू असतो. प्रतिबंधित बीटी बियाण्यांचाही असाच प्रचार, प्रसार करून बोगस बियाणे माथी मारले जाते, नंतर पश्चात्तापाची वेळ येते.

 

टॅग्स :agricultureशेती