शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दुखऱ्या पायाला, बोचऱ्या मनाला औषध मिळावे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:07 IST

भरदुपारी डोक्यावर पेटलेला सूर्य... खाली तापलेला डांबरी रस्ता.. जो-तो घरात दडलेला... तो मात्र बेवारस स्वत:ला शेकत बसलेला. पायात वाहाना नाही, डोईवर उपरणे नाही..

ठळक मुद्देतातडीने उपचाराची गरज : १५ दिवसांपासून भरउन्हात विव्हळतोय वृद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भरदुपारी डोक्यावर पेटलेला सूर्य... खाली तापलेला डांबरी रस्ता.. जो-तो घरात दडलेला... तो मात्र बेवारस स्वत:ला शेकत बसलेला. पायात वाहाना नाही, डोईवर उपरणे नाही.. अन् ओठांवर शब्दही नाही! पायाला भळभळती जखम आहे. पोटात भूक आहे. ओठात तहान आहे. दुखरा पाय घेऊन गुपचूप जगत असलेला हा वृद्ध खरे तर हळूहळू मरत आहे... शेकडो वाटसरू रोज त्याच्याकडे पाहून पुढे जातात, कुणीतरी थांबावे, थोडेसे बोलावे अन् दुखºया पायाला बोचºया मनाला औषध मिळावे..!मंडळी, ही कहाणी एका माणसाची आहे. माणसाची यासाठी की त्याला नाव नाही, गाव नाही, जात नाही अन् पात नाही. घर नाही दार नाही अन् स्वत:शीही प्यार नाही. गेल्या १५ दिवसांपासून राधिका ले-आउट परिसरात त्याने मुक्काम ठोकला आहे. ले-आउटच्या पाटीशेजारीच तो बसलेला असतो. या परिसरातील अनेकांनी त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. पण तो बोलत नाही. सिमकार्ड हरवलेल्या मोबाईलसारखा तो ‘म्यूट’ आहे. पागल वाटावा, असाच त्याचा वेश. पण तो ‘नॉर्मल’ आहे. जेवले का, असे विचारले तर नकारार्थी मान हलवतो. कुठे राहता, म्हटले तर जमिनीवर हात थोपटतो. अन् पैसे घ्या म्हटले तर हात पुढे करतो. पण कुठून आले, असे विचारताच तो निश्चल होतो.हातापायांवर धूळ साचून साचून आता मातीच्या खपल्या झाल्या आहेत. मातीच त्याची त्वचा बनली आहे. अंगाला घाण दर्प सुटलेला आहे. उजव्या पायाला भलीमोठी जखम झालेली आहे. मिळेल तो पालव त्याने त्या जखमेवर गुंडाळून ठेवलेला आहे. काही जणांच्या मते हा गँगरीनचा प्रकार आहे. या वृद्धाला तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज आहे. त्यापूर्वी त्याच्या पोटात दोन घास अन्न आणि पाणी जाण्याची गरज आहे. टळटळीत उन्हात तो रोज असाच राहिला तर आजाराच्याही आधी उष्माघाताने दगावण्याची भीती आहे.जख्ख म्हातारपण आलेल्या या माणसाकडे भान आहे. पण तो कुणाला काहीच सांगत नाही. तो कुठून आला, त्याचे नाव काय, त्याला नेमके काय झाले, तो राधिका ले-आउटमध्येच का थांबलेला आहे... असे अनेक प्रश्न या भागातील सहृदय नागरिक त्याला विचारतात, पण तो फक्त शून्यात नजर लावून बसतो. नागरिकांच्या मनाला मात्र चुटपूट लागते. बापाच्या वयाचा हा माणूस भरउन्हात जखम घेऊन बेवारस का बसतो, हे कुणालाच कळत नाही. कुणीतरी या निनावी माणसाला दवाखान्यात पोहोचविण्याची गरज आहे.हरलेल्या आत्म्यावर विजेत्याचे वस्त्रमाणसाचे आयुष्य विसंगतींनीच भरलेले आहे. हा अस्तित्वहीन वृद्ध काहीतरी उचलून खातो आणि जगतोय. त्याच्या ओळखीच्या कोणत्याच खाणाखुणा त्याच्याकडे नाही. समाजातल्या गर्दीत तो बसतो तरी तो एकटा आहे. हातपाय, नाक, डोळे आहे म्हणून त्याला माणूस म्हणायचे. अन्यथा तो हलता पुतळा बनलेला आहे. काहीही न बोलणाºया या वृद्धाच्या मनात भावना कुठे गडप झाल्या असतील? सर्वस्व हरवून बसलेल्या या माणसाच्या अंगावर कुणीतरी टी-शर्ट चढविले आहे. त्यावर लिहिलेले आहे ‘द ओन्ली थिंग दॅट आय अ‍ॅडिक्टेड इज विनिंग’! आता तो काय जिंकणार? समाजाचे प्रेम की स्वत:चे अस्तित्व?