शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतात शिरलेल्या वाघाने केला शेतकºयाचा पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:06 IST

वाघाचे नाव जरी घेतले तरी, चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते. मात्र प्रत्यक्षात वाघानेच पाठलाग सुरू केला तर...? तालुक्यातील डोंगरगावच्या शेतशिवारात एका शेतकºयाने रविवारी रात्री असा थरार अनुभवला.

ठळक मुद्देडोंगरगाव जंगलातील थरार : दोन वर्षात घेतला दोघांचा बळी, आठ जणांना केले गंभीर जखमी

विठ्ठल पाईलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कझरी : वाघाचे नाव जरी घेतले तरी, चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते. मात्र प्रत्यक्षात वाघानेच पाठलाग सुरू केला तर...? तालुक्यातील डोंगरगावच्या शेतशिवारात एका शेतकºयाने रविवारी रात्री असा थरार अनुभवला. या घटनेने आता पंचक्रोशी दहशतीखाली वावरत आहे.रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील नामदेव तानबा राऊत हे आपल्या शेताची रखवाली करण्यासाठी जंगला शेजारी असलेल्या शेतात जागली गेले. या दरम्यान, शेतात एक पट्टेदार वाघ शिरला. वाघाला पाहून घाबरलेल्या नामदेवरावांनी हिम्मत एकवटून वाघाला शेतातून हुसकावून लावणाचा प्रयत्न केला. मात्र वाघ तो वाघच शेवटी. वाघाने थेट नामदेवरावांवर चाल केली. त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे जीव वाचवित त्यांनी शेतातील माळोशी (आटारी) वर चढून आरडाओरड सुरू केली. आजुबाजूच्या शेतातील लोक आवाजाने धावून आले. एकच हलकल्लोळ उडाला. त्यामुळे वाघानेही माघार घेत तेथून जंगलाकडे धूम ठोकली.तालुक्यातील डोंगरगाव परिसरात वाघाने दोन वर्षापूर्वी एकाचा जीव घेतला होता. या घटनेनंतर अद्यापही हल्लेखोर वाघ याच भागात असून यामुळे शेतकरी वर्गात दहशत पसरली आहे. तालुक्यातील पवनार, डोंगरगाव हा जंगली व बंदी भाग आहे. वाघासाठी या भागात पाण्याचे स्रोतही आहेत. त्यामुळे वाघ या परिसरात भटकत असतो. अनेक पाळीव प्राणीही या वाघाने फस्त केले आहे. याबाबत नामदेव राऊत यांचा मुलगा पवन याने वनविभागाला माहिती दिली. मात्र अद्यापही वन विभागातर्फे वाघाच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना आरंभल्या नाहीत. या परिसरात अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे या भागात वाघ-मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. यातून जनक्षोभ उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.हा परिसर जंगलाने व्यापला असून या भागात वन्यजीवांची संख्या मोठी आहे. येथे बिबटाचाही वापर आहे.वाढत्या हल्ल्याच्या घटनांनी दहशतझरी तालुक्यात आतापर्यंत दुभाटी येथील एक महिला व डोंगरगाव येथील एक पुरुष या हल्ल्यात ठार झाले, तर शिबला येथील एक इसम गंभीर जखमी झाला. या घटनेच्या भयातून आताही त्यांचे कुटुंब सावरले नाही. मांगली व हिरापूर येथील तिघांना एकाच दिवशी वाघाने जखमी केल्याची घटना ताजी आहे. मार्की येथेही शेतात काम करताना चौघावर वाघाने हल्ला चढविला होता. दिवसेंदिवस वाघाचे वाढणारे हल्ले बघता वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.