शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

फुलसावंगीत चक्काजाम

By admin | Updated: June 21, 2015 00:11 IST

रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या फुलसावंगी येथील ..

रस्ता दुरुस्ती : महागाव-फुलसावंगी रस्त्याची चाळणी फुलसावंगी : रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या फुलसावंगी येथील तरुणांनी महागाव-फुलसावंगी मार्गावर शनिवारी चक्काजाम आंदोलन केले. तीन तासाच्या आंदोलनानंतर रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.महागाव-फुलसावंगी रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असे म्हणण्याची वेळ आली आहे. फुलसावंगीपासून ५०० मीटर अंतरावर रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. शाळकरी मुलांना चालणे कठीण झाले आहे. किरकोळ अपघात नित्याची बाब झाली आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. दोन दिवसापूर्वी गावातील ग्राम स्वच्छता अभियानातील तरुणांनी रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देऊन चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र बांधकाम विभागाने या निवेदनाची दखल घेतली नाही. त्यामुळे गावातील विविध संघटनांच्या तरुणांनी फुलसावंगी, महागाव मार्गावर शनिवारी सकाळी चक्काजाम आंदोलन सुरू केले. तरुणांनी रस्त्यावर ठिय्या दिला. यामुळे रस्त्याच्या दोनही कडेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाची दखल घेऊन महागाव ठाणेदार प्रकाश शेळके, पोलीस उपनिरीक्षक नितीन चरडे, जमादार आनंदा चंदेवाड यांनी आंदोलनस्थळ गाठून तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जोपर्यंत कामाला सुरुवात होत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद खराबे फुलसावंगी येथे दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)तीन तासांच्या आंदोलनानंतर रस्ता दुरुस्तीला सुरुवात फुलसावंगी येथील तरुणांनी रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचे शस्त्र उपसले. फुलसावंगी-महागाव रस्त्यावर ठिय्या दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता प्रमोद खराबे तत्काळ फुलसावंगीत दाखल झाले. जेसीबीला पाचारण करून रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. बांधकाम विभागाने ही तत्परता आधीच दाखविली असती तर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना तीनतास ताटकळावे लागले नसते.