शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

बांधकाम अभियंत्यांकडून झाडाझडती

By admin | Updated: November 10, 2014 22:50 IST

रेती तस्करांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे धनोडा येथील पैनगंगेचा पूला धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रकाशित होताच बांधकाम आणि महसूल विभागात

पैनगंगेचा धोकादायक पूल : बांधकाम आणि महसूल विभागात सारवासारवंमहागाव : रेती तस्करांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे धनोडा येथील पैनगंगेचा पूला धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रकाशित होताच बांधकाम आणि महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली. पुसद येथे कार्यकारी अभियंत्यांनी तत्काळ बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच घटनास्थळावर जाऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले तर महसूल विभागानेही या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पथक निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. पैनगंगेचा पूला खचण्याचा धोका निर्माण होऊनही महसूल आणि बांधकाम विभागाला याचा थांगपत्ता नव्हता. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर संपूर्ण यंत्रणाच हादरुन गेली. पुसद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पोपट खंडागळे यांनी तत्काळ बैठक घेतली. या बैठकीला उपविभागीय अभियंता महागाव, कनिष्ठ अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महागावचे उपविभागीय अभियंता प्रमोद खराबे यांना याबाबत खंडागळे यांनी जाब विचारला. सुरक्षा व दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम विभागाची असताना आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी का गेला नाही असा सवाल करीत चांगलीच झाडाझडती घेतली. संबंधित कनिष्ठ अभियंत्याने माहिती का दिली नाही. महसूल विभागाला हा गंभीर प्रकार का कळविला नाही, तसेच हा प्रकार एवढा गंभीर असतानाही पोलिसात तक्रार का दिली नाही, असा सवाल त्यांनी केला. विशेष म्हणजे या बैठकीला संबंधित कनिष्ठ अभियंता बी.डी. चिंचोले गैरहजर होते. नेहमी नॉट रिचेबल राहणाऱ्या या अभियंत्यावर कारवाईचे संकेतही पोपट खंडागळे यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणी घटनास्थळावर जाऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता प्रमोद दुधे यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.बांधकाम विभागाप्रमाणेच महसूल विभागातही या वृत्ताने खळबळ उडाली. महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळेच तस्करांनी पुलाजवळ तेही पिल्लरजवळ खड्डे खोदले. यामुळे हा पूल खचण्याची भीती निर्माण झाली. या प्रकाराची गंभीर दखल उपजिल्हाधिकारी विकास माने यांनी घेतली. महसूल विभागाचे पथक तयार करून त्याची चौकशी केली जाणार आहे. तसेच रेती चोरीचाही आढावा घेण्यात येईल. दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती असून तस्करांंवरही फौजदारी कारवाईचे निर्देश दिले असल्याची माहिती आहे. दरम्यान आज परिसरातील अनेकांनी या पुलाची झालेली अवस्था अगदी जवळून पाहिली. अनेक जण पुलाच्या खाली उतरुनही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत होते. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कधी लक्षच गेले नाही. या पुलाच्या डागडुजीसाठी आता सर्व उपाययोजना केल्या जाणार आहे. मात्र रेती तस्करांवर कसा अंकुश प्रशासन ठेवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)