यवतमाळ : जिल्ह्याचा सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ आणि माजी सैनिकांचा मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात घेण्यात आला. यावेळी जिल्हाभरातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, कमांडिंग आफीसर कर्नल अजित चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी फ्लाईट लेफ्टनंट धनंजय सदाफळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, निवृत्त कॅप्टन दिनेश तत्त्ववादी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शहीद तथा माजी सैनिकांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. माजी सैनिकांना काही समस्या असल्यास लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी व माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी तसेच कर्नल अजित चव्हाण यांचीही यावेळी भाषणे झाली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी प्रास्ताविक केले. संचालन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वसंत मत्ते यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. (वार्ताहर)
ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिकांचा मेळावा
By admin | Updated: December 14, 2015 02:34 IST