लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावातील मुलीला चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्याशी जबरदस्ती लग्न करून अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.पंकज अंबादास देवतळे (३०) रा. मुबारकपूर ता. बाभूळगाव असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने १४ जुलै २०१२ मध्ये राळेगाव येथील पीडितेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून मुबारकपूर येथे आणले. तिथे तिच्याशी मर्जीविरूद्ध लग्न करून अत्याचार केला. संधी मिळताच पीडिताने स्वत:ची सुटका करून घेतली. आरोपी विरोधात राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पी.एन.इंगळे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी या खटल्यात एकूण तीन साक्षीदार तपासले.यामध्ये पीडित व तिच्या आईची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला शिक्षा ठोठावली. सहायक सरकारी वकील अॅड़ विजय तेलंग यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड़ स्वप्नील धावर यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाला पैरवी अधिकारी उत्तम बावने यांचे सहकार्य मिळाले.
अपहरण व अत्याचारात पाच वर्षे कैदेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 21:20 IST
गावातील मुलीला चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्याशी जबरदस्ती लग्न करून अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.
अपहरण व अत्याचारात पाच वर्षे कैदेची शिक्षा
ठळक मुद्देमुबारकपूरचा आरोपी : चाकूच्या धाकावर लग्न