शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांच्या पाच हजार जोडण्या अडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 21:58 IST

वीज वितरण कंपनीने वीज जोडणी करण्यासाठी कृषीपंपाला एचव्हीडीएस योजनेशी जोडले आहे. या योजनेत प्रत्येक जोडणीला एक स्वतंत्र डीपी मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात डीपीची कमतरता आहे. यामुळे कृषीपंपाच्या पाच हजार जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत.

ठळक मुद्देएचव्हीडीएस कुचकामी : दुष्काळात शेतकऱ्यांपुढे नवे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने वीज जोडणी करण्यासाठी कृषीपंपाला एचव्हीडीएस योजनेशी जोडले आहे. या योजनेत प्रत्येक जोडणीला एक स्वतंत्र डीपी मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात डीपीची कमतरता आहे. यामुळे कृषीपंपाच्या पाच हजार जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत.दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी सिंचनाचा आधार घेत आहेत. हे सिंचन करता यावे म्हणून शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर सिंचन विहिरींवर आहे. धडक सिंचन योजनेच्या विहिरीसोबत शेतकऱ्यांनी स्वत: कर्ज काढून विहिरीचे काम पूर्ण केले. यामुळे सिंचन करता येणार असा विश्वास शेतकऱ्यांना होता. प्रत्यक्षात सिंचन विहिरी पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना वीज जोडण्या मिळाल्या नाही. यातून शेतकºयांपुढील अडचणीत भर पडली आहे.वीज वितरण कंपनीने मार्च २०१८ पर्यंतच वीज जोडणीचे अर्ज स्वीकारले आहेत. यानंतर दिले जाणारे अर्ज आॅनलाईन यंत्रणेवर स्वीकारलेच जात नाही. यामुळे यानंतरच वीज जोडणी संख्या गुलदस्त्यात आहे. सन २०१६ ते २०१८ पर्यंतचे वीज जोडणीचे सहा हजार ८८७ अर्ज वीज वितरण कंपनीकडे आले आहे. या शेतकºयांना एचव्हीडीएस योजनेतून जोडण्या दिल्या जाणार होत्या. त्याकरिता वीज वितरण कंपनीने योजनाही जाहीर केली. या योजनेत वीज जोडणी करताना एक शेतकरी एक डीपी असा नियम जाहीर करण्यात आला. जितके अर्ज तितक्याच डीपी शेतकऱ्यांना लागणार होत्या.त्याचे कंत्राट त्रयस्त संस्थेकडे देण्यात आले. या संस्थेने तत्काळ डीपी पुरवठा करण्याचा शब्द वीज कंपनीला दिला होता. प्रत्यक्षात या डीपी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाही. यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत. दुष्काळी स्थितीत पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी अशा कृषीपंपाच्या वीज जोडण्या तत्काळ सुरू करण्यात याव्या या मागणीसाठी वीज कंपनीकडे येरझारा सुरू केल्या आहेत. मात्र डीपीच उपलब्ध नाही. यामुळे वीज जोडण्या आता थांबल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळातही महावितरणची यंत्रणा शेतकºयांना आणखी अडचणीत आणण्याचे काम करीत आहे.एचव्हीडीएस योजनेतून ८१७ वीज जोडण्यावीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एचव्हीडीएस योजनेतून आतापर्यंत ८१७ वीज जोडण्या करून दिल्या आहेत. तर २१० वीज जोडण्या प्रगतीपथावर आहे. यानंतरही जवळपास पाच हजार जोडण्या प्रलंबित आहेत.वीज जोडणी करण्याचे काम कंपनीने युध्दपातळीवर सुरू केले आहे. वीज जोडणीसाठी लागणाºया डीपी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत. त्यानुसार जोडणीचे काम करण्यात आले आहे.- सुरेश मडावीअधीक्षक, अभियंतावीज वितरण कंपनी

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज