शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाघाला पकडण्यासाठी पाच पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:07 IST

नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी अखेर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून वन विभागाच्या पाच रेस्क्यू टीम सखी जंगलात दाखल झाले आहे.

ठळक मुद्देसात पिंजरे व तीन मचान : सखी येथे शोकाकूल वातावरणात सतीश कोवेवर अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/राळेगाव : नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी अखेर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून वन विभागाच्या पाच रेस्क्यू टीम सखी जंगलात दाखल झाले आहे. दरम्यान, वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणावर शोकाकूल वातावरणात रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आतापर्यंत सहा बळी घेतल्याने संतप्त गावकºयांनी वन विभागावर रोष व्यक्त करीत उपविभागीय महसूल अधिकाºयाचे शासकीय वाहन शनिवारी रात्री पेटवून दिले होते. दरम्यान, गावातील तणाव निवळला असला तरी परिसरातील दहा गावांमध्ये वाघाची दहशत कायमच आहे.गत वर्षभरापासून राळेगाव तालुक्यातील वन विकास महामंडळाच्या जंगलात वाघाची दहशत आहे. आतापर्यंत या वाघाने सहा जणांचा बळी घेतला आहे. शनिवारी सखी येथील सतीश पांडुरंग कोवे (१९) या तरुणावर हल्ला करून त्याला ठार केले. त्याचा मृतदेह ३०० मीटरपर्यंत फरफटत नेला. वाघाचे सातत्याने हल्ले होत असताना वन विभाग मात्र कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने सखी येथील गावकरी संतप्त झाले. याच रोषाचा सामना उपविभागीय महसूल अधिकारी संदीपकुमार अपार यांना करावा लागला. ते आपल्या शासकीय वाहनाने सखी येथे शनिवारी रात्री गेले होते. त्यावेळी वन विभागाचे वाहन समजून गावकºयांनी त्यांच्याच वाहनाला पेटवून दिले. या घटनेने प्रशासनात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठांनी सखीकडे धाव घेतली. गावकºयांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. परंतु कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर रात्री जिल्हा परिषद बांधकाम सभापती निमिष मानकर, राळेगाव पंचायत समितीचे माजी सभापती अशोक केवटे, कृष्णापूरचे सरपंच भीमराव बोटोणी, पंचायत समितीचे माजी सदस्य विजय तेलंग, अरविंद फुटाणे, जया रागिनवार, दत्तात्रय देशमुख, भीमराव पुरके यांनी गावकºयांची समजूत काढली. त्यानंतर रात्रीच सतीश कोवे याचा मृतदेह एका ट्रॅक्टरमधून राळेगावला शवविच्छेदनासाठी रवाना केला.दरम्यान, वन विभागाने या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. प्रधान वन्यजीव विभागाकडून वाघाला बेशुद्ध करण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच अमरावती, बुलडाणा, मेळघाट आणि चंद्रपूरवरून पाच रेस्क्यू पथक पाचारण करण्यात आले आहे. तसेच वाघाला पकडण्यासाठी सात पिंजरे, दहा सीसीटीव्ही कॅमेरे, तीन मचान पुरविण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग सज्ज झाला आहे. वन विकास महामंडळाचे मुख्य वनसंरक्षक त्रिपाठी, यवतमाळ मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण आणि वन विकास महामंडळाचे उपवनसंरक्षक व्ही.एन. पुनसे या परिसरात दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी वन विभागाने सात ट्रॅप कॅमेरे लावले होते. परंतु त्यात वाघ दिसला नाही. २३ आॅगस्ट रोजी गजानन पवार या तरुणाचा वाघाने बळी घेतला. दुसºया दिवशी बंदर शिवारात गोºह्याची शिकार केली. यावेळी पगमार्कवरून नर आणि मादी असे दोन वाघ असल्याचे स्पष्ट झाले होते. हे जंगल घनदाट असून १५ किलोमीटर परिघात आहे.१०० तरुणांचे पथक तयार करण्यासाठी विशेष प्रतिसाद नाहीतणावात शवविच्छेदनवाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या सतीश कोवे याचा मृतदेह गावकºयांची समजूत काढून राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. रविवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. वन विभागाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करीत होते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सखी येथे दुपारी सतीशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तहसीलदार हेमंत गांगुर्डे व पोलीस उपस्थित होते. यावेळी सतीशच्या नातेवाईकांचा आक्रोश आसमंत भेदून टाकणारा होता. प्रत्येकजण रोष व्यक्त करीत होता.यांचा गेला बळीराळेगाव तालुक्यात वर्षभरात वाघाने सहा जणांचा बळी घेतला. त्यात सोनाबाई वामन घोसले रा.सराटी, सखाराम लक्ष्मण टेकाम रा.झोटींगधरा, मारुती विठोबा नागोसे रा.खैरगाव, प्रवीण पुंडलिक सोनोने रा.तेजनी, गजानन शामराव पवार रा.सराटी आणि आता शनिवारी सतीश पांडुरंग कोवे रा.सखी यांचा समावेश आहे. सोबतच वाघाने अनेक जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी-शेतमजूर आणि गुराखी जंगलात जाण्यासाठी घाबरत आहेत.