शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यांत वीज कोसळून 6 ठार, कळंब, राळेगाव आणि दारव्हा तालुक्यांतील घटनांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:51 IST

जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या तांडवात पाच जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राळेगाव तालुक्यातील वरणा, कळंब तालुक्यांतील आमला आणि दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे झालेल्या या घटनेत आई आणि मुलीसह शेतमजूर व शेतकरी ठार झाले.

यवतमाळ : जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या तांडवात पाच जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राळेगाव तालुक्यातील वरणा, कळंब तालुक्यांतील आमला आणि दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे झालेल्या या घटनेत आई आणि मुलीसह शेतमजूर व शेतकरी ठार झाले.चंदा शंकर रामगडे (६०), तेजस्वीनी शंकर रामगडे (२५), मधुकर पुरुषोत्तम ठोंबरे (३०) सर्व रा. आमला ता. कळंब, हेमंत श्रीकृष्ण थरकडे (२५) रा. पाभळ ता. दारव्हा आणि मंजुळा चंद्रभान राऊत (६५) रा. निमगव्हाण ता. कळंब, अशी मृतांची नावे आहे. तर सुमित्रा माणिकराव अंबाडारे (४२), विजय माणिक अंबाडारे, दिनू चंद्रभान राऊत हे जखमी झालेत. कळंब तालुक्यातील आमला येथील चंदा आणि तेजस्वीनी या मायलेकी मक्त्याने केलेल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक वीज कोसळली. त्यात दोघेही जागीच ठार झाल्या. तर याच गावातील मधुकर ठोंबरे हा एका शेतात काम करीत असताना वीज कोसळून ठार झाला.राळेगाव आणि कळंब तालुक्याच्या सीमेवर असलेल्या निंबगव्हाण, वरणा शिवारात गुरुवारी दुपारी २ वाजता कापूस वेचण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज मजुरांच्या अंगावर पडली. त्यात मंजुळा राऊत जागीच ठार झाल्या. तर इतर तिघे जण जखमी झाले. अचानक वीज कोसळल्याने सर्वच जण बेशुद्ध पडले होते. काही वेळाने विजय अंबाडारे आणि दिनू राऊत यांना शुद्ध आली. पाहतात तर काय मंजुळाबाई ठार झालेल्या आणि सुमित्राबाई गंभीर जखमी होत्या. या जखमींना तत्काळ राळेगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून यवतमाळला हलविण्यात आले. तिसरी घटना दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे घडली. हेमंत श्रीकृष्ण थरकडे (२५) हा आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचणीवर लक्ष ठेवण्यासाठी गेला होता. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक अंगावर वीज कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत प्रथम लोणी आणि नंतर आर्णी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी हेमंतला मृत घोषित केले.