शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पाच कोटींचे चुकारे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:02 IST

जिल्ह्यातील १२ शासकीय हमी केंद्रांवर आत्तापर्यंत खरेदी झालेल्या धान्याचे सुमारे पाच कोटींचे चुकारे अडले आहे. यामुळे हमी केंद्र नावालाच उरले असून शेतकरी आर्थिक विवेचनेला सामोरे जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीन, मूग, उडीद : ३३ हजार क्ंिवटलची खरेदी, शासकीय हमी केंद्र नावाला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील १२ शासकीय हमी केंद्रांवर आत्तापर्यंत खरेदी झालेल्या धान्याचे सुमारे पाच कोटींचे चुकारे अडले आहे. यामुळे हमी केंद्र नावालाच उरले असून शेतकरी आर्थिक विवेचनेला सामोरे जात आहे.जिल्ह्यातील हमी केंद्रांवर नोव्हेंबर अखेरपर्यंत ३३ हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. या धानयाच्या खरेदीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ११ कोटी रुपये देणे होते. प्रत्यक्षात जिल्ह्याला सहा कोटी रूपयेच प्राप्त झाले. त्यामुळे पाच कोटींचे चुकारे अडले आहे. दिवाळीपूर्वी शासनाने जिल्ह्यात सोयाबीन, मूग आणि उडदासाठी १२ शासकीय खरेदी केंद्र सुरू केले. गेल्या सव्वा महिन्यात या केंद्रांवरून ३३ हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली.सोयाबीनच्या १२ हमी केंद्रांवर ३० हजार २७२ क्विंटलची खरेदी झाली. सोयाबीनच्या चुकाºयासाठी जिल्ह्याला नऊ कोटी २३ लाख ३८६ रूपयांची गरज होती. प्रत्यक्षात पाच कोटी ५५ लाख ३९ हजार रूपयांचा निधी हमी केंद्रांना मिळाला. जिल्ह्यात मूग आणि उडदाची ५ हमी केंद्रांवर खरेदी करण्यात आली. यात तीन हजार ६१८ क्विंटल उडीद आणि २९७ क्विंटल मुगाची खरेदी झाली. त्यात अडदाचे ७७ लाखांचे, तर मुगाचे ९ लाखांचे चुकारे मिळाले. सोयाबीन, मूग आणि उडीद मिळून अद्याप पाच कोटींचे चुकारे रखडले आहे. या चुकाºयाची शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा आहे.यावर्षी अल्प पावसामुळे शेतकऱ्यांना कपाशीची उतारीत घट आली. त्यातच सुरुवातीला कमी दरामुळे शेतकºयांंना आर्थिक नुकसान सोसावे लागले. यामुळे शेतकºयांची सर्व भिस्त सोयाबीन, मूग, उडीद आणि रबी हंगामातील गहू व हरभरा पिकावर अवलंबून आहे.१९०० क्ंिवटल कापूसजिल्ह्यातील सहा शासकीय हमी केंद्रांवर पणन महासंघातर्फे कापूस खरेदी केली जात आहे. या केंद्रांवर आतापर्यंत जवळपास १९३० क्ंिवटल कापसाची खरेदी झाली आहे. खरेदी झालेल्या बहुतांश कापसाचे चुकारे अदा करण्यात आल्याचे पणन महासंघातर्फे सांगितले जाते. दरम्यान, ७६६ शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी आॅनलाईन बुकींग केली आहे.शेतकरी आर्थिक अडचणीतहमी दरामुळे शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रांवर आपले धान्य विकले. या केंद्रातून दोन पैसे जादा मिळतील, अशी अपेक्षा त्यांना होती. प्रत्यक्षात खरेदी झालेल्या धान्यातील अर्ध्या अधिक लाभार्थ्यांना चुकारेच मिळाले नाही. त्यामुळे हे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.