शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या प्रयत्नात बीडचे पाच गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 22:05 IST

येथील आठवडी बाजार परिसरात गुरुवारी सायंकाळी वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या एका टोळीला अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त केल्याने अन्य काही गुन्ह्यांचा उलगडा होतो का, या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.

ठळक मुद्देघातक शस्त्रे जप्त : वाहन पुण्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील आठवडी बाजार परिसरात गुरुवारी सायंकाळी वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या एका टोळीला अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त केल्याने अन्य काही गुन्ह्यांचा उलगडा होतो का, या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.सुशील अशोकराव माने (२५) रा. सुरुमगाव ता. माझरगाव जि. बिड ह.मु. मागडेवाडी पुणे, मधुकर संग्राम राठोड रा. रावण कोडा ता. जलकोट जि. लातूर ह.मु. कात्रजमागेवाडी, पुणे, शेख मुकीद शेख कासम (२९) रा. गावराई जि. बिड ह.मु. सय्यदनगर पुणे, गजानन बलभीम माने (२५) रा. सुरुमगाव ता. माझरगाव जि. बीड, अतुल चंद्रभान सवाडे (२६) रा. बोरगाव धांदे ता. धामणगाव रेल्वे जि. अमरावती अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. त्यांच्या ताब्यातून एम.एच.१२/के.एन-३६७४ क्रमांकाची पुणे पासिंगची ओला टॅक्सी जप्त करण्यात आली. या आरोपींच्या वाहनाची झडती घेतली असता देशी पिस्टल, दोन राऊंड, धारदार चाकू, फर्शा, छत्री रॉड, अर्धा किलो मिरची पूड, पेंचीस आदी साहित्य आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता या आरोपींकडून समाधानकारक व खात्री होईल, असे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. शहरात दरोडा घालण्याच्या उद्देशाने ही टोळी फिरत असावी, असा संशय व्यक्त करीत वडगाव रोड पोलिसांनी या आरोपीविरुद्ध शस्त्र प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ व ४/२५ अन्वये गुन्हा नोंदविला. या आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ठाणेदार शिवाजी बचाटे अधिक तपास करीत आहे.गुन्हेगारी टोळीच्या ‘हिशेबा’चा तर हेतू नव्हे?आम्ही माहूर परिसरात रेती घाट घेतला, तेथे धमक्या मिळतात, त्या अनुषंगाने स्वरक्षणासाठी शस्त्र हवे असून ते यवतमाळात मिळते म्हणून येथे आल्याचे हे आरोपी खासगीत कबूल करीत आहे. परंतु पोलिसांना त्यांच्या या सांगण्यावर विश्वास नाही. बिडचे आरोपी, पुण्यात राहणारे आणि शस्त्रासाठी थेट यवतमाळात आले कसे यावर तपास केंद्रीत करण्यात आला आहे. ज्या भागात या आरोपींचा वावर आढळला ते पाहता गुन्हेगारी टोळ्यांमधील ‘हिशेब’ चुकता करण्यासाठी तर ऐन दिवसावर हे युवक आले नव्हते ना, या बाजूनेही वडगाव रोड पोलीस चाचपणी करीत असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Crimeगुन्हा