शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

वर्षभरात साडेपाच हजार शस्त्रक्रिया

By admin | Updated: November 24, 2014 23:08 IST

जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून या एक वर्षात ही योजना जिल्ह्यातील रूग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांसह

जीवनदायी आरोग्य योजना : शस्त्रक्रियांसाठी रूग्णालयांना १३.३७ कोटीयवतमाळ : जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून या एक वर्षात ही योजना जिल्ह्यातील रूग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांसह राज्यातील विविध रूग्णालयांमध्ये पाच हजार ६६२ रूग्णांवर या योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. शस्त्रक्रियांसाठी रूग्णालयांना १३ कोटी ३७ लाख रुपये देण्यात आले आहे. जीवनदायी योजनेंतर्गत जवळजवळ सर्वच आजारांवर दीड लाख रुपये खर्चाच्या मर्यादेपर्यंत या योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येते. ही एक आरोग्य योजना असून या योजनेंतर्गत ९७१ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचारासोबत १२१ प्रकारच्या आजारांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक लाख ५० हजारापर्यंत तर मूत्रपिंड प्रत्यारोपणाकरिता दोन लाख ५० हजार रुपयापर्यंत योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेसाठी लाभार्थ्यांजवळ पिवळे किंवा केसरी शिधापत्रक अथवा अन्नपूर्णा, अंत्योदय योजनेचे शिधापत्रक असणे आवश्यक आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत जिल्ह्यात ५ लाख १८ हजार कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहे. त्यात १ लाख ३३ हजार पिवळे शिधापत्रिकाधारक, २ लाख ४७ हजार केशरी शिधापत्रिकाधारक, १ लाख ३४ हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक तर ४ हजार ६९२ अन्नपूर्णा योजनेचे शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा समावेश आहे. या कुटुंबांचे आरोग्य पत्र तयार करून वितरणाचे काम जिल्हयात मोठया प्रमाणावर सुरु आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ९६ हजार कुटुंबांना आरोग्यपत्र वितरण करण्यात आले आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी योजनेचा शुभारंभ तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला होता. २१ नोव्हेंबर रोजी योजनेला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षात जिल्ह्यातील एकूण ५ हजार ६६२ रूग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी १६४२ शस्त्रक्रिया जिल्ह्यातील या योजनेसाठी मान्यताप्राप्त आठ रूग्णालयांमध्ये करण्यात आल्या आहेत. अन्य शस्त्रक्रिया या राज्यातील विविध रूग्णालयांमध्ये झाल्या आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांना शस्त्रक्रियांसाठी ४० लाख ३९ हजार रुपये वितरित करण्यात आले. तर जिल्ह्यासह राज्यातील विविध रूग्णालयांना १३ कोटी ३७ लाख रुपये शस्त्रक्रियेपोटी देण्यात आले आहे. आर्थिक अडचणीमुळे खर्चिक शस्त्रक्रिया सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे गंभीर आजाराप्रसंगी फार मोठे संकट गरीब व गरजू रूग्णांपुढे उभे राहत होते. आता या योजनेंतर्गत सहज शस्त्रक्रिया करता येत असल्याने हजारो रूग्णांना दिलासा मिळत असून त्यांच्यासाठी योजना खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. (प्रतिनिधी)