शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis : चिंताजनक! यवतमाळमध्ये म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 16:11 IST

यवतमाळात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातून सांगण्यात आले. त्यापैकी ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. एकावर उपचार सुरू आहे.

यवतमाळ: कोरोना रुग्णांमध्ये उद्‌भवणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराचे राज्यात दीड हजारांवर रुग्ण असून कित्येकांचा त्यात मृत्यूही झाला आहे. या मृत्यूमालिकेत आता यवतमाळचेही नाव जोडले गेले आहे. येथे म्युकरमायकोसिस या आजाराने ६० वर्षीय महिला रुग्णाचा शुक्रवारी १४ मे रोजी मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. (First victim of Myucormicosis in Yavatmal)

यवतमाळात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातून सांगण्यात आले. त्यापैकी ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. एकावर उपचार सुरू आहे. तर दुसऱ्याला सुटी देण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय मात्र म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात सात ते आठ रुग्ण असल्याचे सांगत आहे. अनियंत्रित मधुमेह, कॅन्सर, अशक्तपणा, स्टेरॉईडचा अधिक प्रमाणात वापर यामुळे हा आजार होत असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाग्रस्त रुग्णाला स्टेरॉईडची औषधी दिली जाते. परंतु त्याचे प्रमाण जास्त झाल्यास म्युकरमायकोसिस हा आजार होण्याची शक्यता राहत असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. या आजाराची संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालयात म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डच तयार करण्याचे नियोजन आहे.

वणी विभागातही रुग्ण सापडलाजिल्ह्यातील वणी विभागातसुद्धा म्युकरमायकोसिसचा रुग्ण सापडला असून त्याला पुढील उपचारार्थ यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण ६५ वर्षाचा असून झरी तालुक्यातील बोपापूर भागातील रहिवासी आहे. त्याला वणी येथे ट्रामा केअर सेंटरमध्ये कोरोनाचे निदान झाल्याने उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. प्रकृती ठिक झाल्याने त्याला ९ मे रोजी सुटी देण्यात आली होती. परंतु त्यानंतर घरी त्याला त्रास वाढल्याने १५ मे रोजी तो पुन्हा वणी येथे शासकीय रुग्णालयात आला. तेथे त्याचे सीटी स्कॅन केले असता म्युकरमायकोसिस या आजाराची सुरुवात झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला यवतमाळला हलविण्यात आले. 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्याYavatmalयवतमाळ