शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पहिला ‘सुरक्षित भाजी बाजार’ यवतमाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे चहुबाजूंनी कापडी शामियाना लावून बाजार ‘बंदिस्त’ करण्यात आला. प्रवेशासाठी एकच प्रवेशद्वार ठेवण्यात आले. तेथून प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला आधी सॅनिटाईज केले जाते. आत प्रवेश करताना प्रत्येकाच्या हातावर पुन्हा सॅनिटायझर दिले जाते. ग्राहक आत शिरताच त्याला आपण भाजी बाजारात आलो की मॉलमध्ये असा प्रश्न पडावा अशा प्रकारची दुकानांची रचना येथे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देना गर्दी, ना कोलाहल : जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटनेचा उपक्रम यशस्वी

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन झाले तरी भाजीपाला खरेदीसाठी गावागावात गर्दी होतच आहे. मात्र यावर नामी उपाय यवतमाळकरांनी शोधला आणि यशस्वीही केला. शहरात गेल्या तीन दिवसांपासून ‘सुरक्षित भाजी बाजार’ भरविला जात आहे. जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन सामाजिक संघटनेने सुरू केलेला हा बाजार महाराष्ट्रातील पहिला यशस्वी उपक्रम ठरला आहे.भाजीपाल्याची दुकाने म्हणताच सर्वत्र कचरा, आरडाओरड, दुर्गंधी असे वातावरण दिसते. कोरोनाच्या सावटात तर हे वातावरण अत्यंत धोकादायक ठरते. मात्र हा सर्व प्रकार टाळून यवतमाळच्या दर्डानगर परिसरातील दीपनगरात संकल्प फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ‘सुरक्षित भाजी बाजार’ भरविला जात आहे. या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे चहुबाजूंनी कापडी शामियाना लावून बाजार ‘बंदिस्त’ करण्यात आला. प्रवेशासाठी एकच प्रवेशद्वार ठेवण्यात आले. तेथून प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला आधी सॅनिटाईज केले जाते. आत प्रवेश करताना प्रत्येकाच्या हातावर पुन्हा सॅनिटायझर दिले जाते. ग्राहक आत शिरताच त्याला आपण भाजी बाजारात आलो की मॉलमध्ये असा प्रश्न पडावा अशा प्रकारची दुकानांची रचना येथे करण्यात आली आहे.शामियानाच्या आत ‘बंदिस्त’ केलेल्या मैदानात सुरक्षित अंतर ठेऊन दुकानांची मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक दुकानदारालाही आत येताना सॅनिटाईज केले जाते. त्याहून महत्वाचे म्हणजे मास्क लावल्याशिवाय येथे दुकानदारांना आणि ग्राहकांना प्रवेशच दिला जात नाही. ३ मेपासून दररोज सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत भरणाऱ्या या बाजाराला प्रतिसाद मिळत आहे.प्रशासनाकडून दखलकोरोनाच्या संकटात नागरिकांंना जीवनावश्यक भाजीपाला सुरक्षित वातावरणात मिळावा यासाठी हा उपक्रम राबविल्याचे संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सचिव वसंत शेळके यांनी सांगितले. या बाजाराची उपयोगिता लक्षात घेऊन स्वत: निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी येथे भेट दिली. कोरोना काळात समाजकार्यासाठी सरसावलेल्या इतरही सामाजिक संघटनांनी अशा प्रकारचे अभिनव उपक्रम सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार