शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

यवतमाळात साकारणार पहिली खासगी निवासी क्रीडा प्रबोधिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:11 IST

तळागाळातील व दुर्गम भागातील गरीब, होतकरू खेळाडू शोधून त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संधी निर्माण करून देण्यासाठी क्रीडा भारती व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यांच्या प्रयत्नातून यवतमाळात पहिली खासगी निवासी क्रीडा प्रबोधिनी साकारली जाणार आहे.

ठळक मुद्देक्रीडा भारती व वाणिज्य महाविद्यालयाचा उपक्रम२० खेळाडूंना प्रवेश, शिक्षण, निवास, भोजन, गणवेष, वैद्यकीय सुविधा

नीलेश भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तळागाळातील व दुर्गम भागातील गरीब, होतकरू खेळाडू शोधून त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संधी निर्माण करून देण्यासाठी क्रीडा भारती व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यांच्या प्रयत्नातून यवतमाळात पहिली खासगी निवासी क्रीडा प्रबोधिनी साकारली जाणार आहे. अखिल भारतीय स्तरावर कार्य करणाऱ्या क्रीडा भारतीची ही देशातील पहिलीच क्रीडा प्रबोधिनी ठरणार आहे, हे विशेष.क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याच्या उद्देशाने रविवारी येथील विवेकानंद विद्यालयात यवतमाळ क्रीडा भारतीतर्फे सभा व चर्चा सत्र घेण्यात आले. अध्यक्षस्थानी क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष सतीश फाटक होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सहमंत्री प्रसन्न हरदास, संपर्कमंत्री राजेश गढीकर, अजय म्हैसाळकर, जिल्हामंत्री दिलीप राखे उपस्थित होते.प्रस्तावीत क्रीडा प्रबोधिनीत ११ वर्ष वयाच्या मुला-मुलींची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशित खेळाडूंना अ‍ॅथेलेटिक्स, स्विमींग, ज्युदो या खेळांचे तज्ज्ञ प्रशिक्षणामार्फत प्रशिक्षण दिले जाईल. क्रीडा प्रशिक्षणाबरोबरच या खेळाडूंना नामांकित शाळेत शिक्षण, निवास, भोजन, स्पोर्टस किट, गणवेश, वैद्यकीय सुविधा देण्यात येईल. ही पूर्णत: निवासी स्वरुपाची क्रीडा प्रबोधिनी राहणार असून यासाठी प्रवेशित खेळाडूंना नाममात्र शुल्क राहणार आहे.वाणिज्य महाविद्यालयाचे होस्टेल व स्टेट बँक चौक परिसरात मुला व मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था राहणार आहे. दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षण दिले जाणार आहे. क्रीडा प्रबोधिनी व खेळाच्या माध्यमातून सशक्त, सुसंस्कारित, शिस्तबद्ध, राष्ट्रप्रेमी, युवकांची पिढी देशाकरिता निर्माण करण्याचे कार्य निरंतर चालू राहील, असे सहमंत्री प्रसन्न हरदास यांनी सांगितले.सभेत क्रीडा प्रबोधिनीची इत्थंभूत माहिती शिरीष टोपरे यांनी प्रास्तविकातून दिली. या प्रसंगी विविध समित्यांचे गठन करण्यात आले. चर्चासत्राला किशोर इंगळे, प्राचार्य राजेंद्र क्षीरसागर, मीराताई फडणीस, माणिक पांडे, महेश जोशी, अविनाश जोशी, सुरेश राठोड, दत्तराव धुडे आदी उपस्थित होते.१६ जूनपासून प्रवेश प्रक्रियाक्रीडा प्रबोधिनी प्रवेशाकरिता रविवार, १६ जून रोजी सकाळी ९ वाजता दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालय क्रीडांगणावर शारीरिक क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा चाचणीत जिल्ह्यातील ११ वर्ष पूर्ण आणि १२ वर्षपेक्षा जास्त वय नसलेले मुले-मुली सहभागी होऊ शकतात. या निवड चाचणीतून २० मुले-मली निवडून त्यांना प्रबोधिनीत प्रवेश दिला जाईल. २२ जून रोजी या क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन होईल, असे जिल्हाध्यक्ष सतीश फाटक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र