शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार कोटींच्या रस्त्यांसाठी ‘वेबीनार’ चा राज्यातील पहिला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 10:06 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मिशन असलेल्या ‘हायब्रीड अ‍ॅन्युटी’ला गती देण्यासाठी ‘वेबीनार’चा राज्यातील पहिला प्रयोग मंगळवारी राबविला गेला.

ठळक मुद्देदेश-विदेशातील बांधकाम कंपन्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्याचे मिशन असलेल्या ‘हायब्रीड अ‍ॅन्युटी’ला गती देण्यासाठी ‘वेबीनार’चा राज्यातील पहिला प्रयोग मंगळवारी राबविला गेला. या ‘वेबीनार’मध्ये रस्ते-पूल बांधकाम क्षेत्रातील देश-विदेशातील २०० पेक्षा अधिक कंपन्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आॅनलाईन सहभाग घेतला.राज्यात १० हजार किलोमीटरच्या रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. ३० हजार कोटी रुपये बजेट असलेल्या या बांधकामासाठी ‘हायब्रीड अ‍ॅन्युटी’ पॅटर्न आणला गेला. याअंतर्गत कंत्राटदार आपली गुंतवणूक करणार आणि नंतर शासन त्याला टप्प्याटप्प्याने परतावा देणार आहे. परंतु या योजनेला कंत्राटदार कंपन्यांचा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून ‘हायब्रीड अ‍ॅन्युटी’ नेमके काय आहे, हे देशभरातील बांधकाम कंपन्यांसमोर ठेवण्यासाठी ‘वेबीनार’ पार पडले. सेमीनारमध्ये कंपन्यांचे प्रतिनिधी एका स्थळी प्रत्यक्ष सहभागी होतात. परंतु ‘वेबीनार’मध्ये ते असतील त्या ठिकाणावरून आॅनलाईन सहभागी होवू शकतात.

‘अ‍ॅन्युटी’कडे उद्योजकांचा वाढतोय कल‘वेबीनार’नंतर बांधकाम क्षेत्रातील अनेक बड्या उद्योजक कंपन्यांचा ‘हायब्रीड अ‍ॅन्युटी’कडे कल वाढत असल्याचे सांगण्यात आले. उद्योजकांच्या मनात ‘हायब्रीड अ‍ॅन्युटी’बाबत विश्वास वाढावा, देश-विदेशातील कंपन्यांना नेमकी कल्पना समजावी या उद्देशानेच ‘वेबीनार’चा हा प्रयोग राबविण्यात आला आणि यशस्वीही झाल्याचे मानले जाते. सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी राबविलेला हा पॅटर्न आता शासनाच्या अन्य खात्यांसाठीही वापरला जाण्याची शक्यता आहे.

मंत्री-सचिवांकडून शंकांचे निरसन‘वेबीनार’चे केंद्र सार्वजनिक बांधकाम मंत्रालयात होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंग, तांत्रिक सचिव सी.पी. जोशी आदी उपस्थित होते. देशभरातील हैद्राबाद, बेंगलोर सारख्या वेगवेगळ्या महानगरांमधून तसेच विदेशातूनही बांधकाम उद्योजक कंपन्यांचे प्रतिनिधी व शासनाच्या वरिष्ठ प्रमुख अभियंत्यांनी या ‘वेबीनार’मध्ये सहभाग घेतला. यावेळी ‘हायब्रीड अ‍ॅन्युटी’वरील प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या ‘वेबीनार’मध्ये कंत्राटदार कंपन्यांच्या विविध शंकांचे मंत्री व सचिवांनी जागीच निरसन केले.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान