शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकारिणीचा मुहूर्तच सापडेना !

By admin | Updated: August 1, 2014 00:27 IST

विविध विषयांमुळे वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलेली काँग्रेस आता जिल्हा कार्यकारिणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना

महिनाभरापासून प्रतीक्षा : सर्व गटांना सामावून घेण्याचे आव्हानयवतमाळ : विविध विषयांमुळे वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलेली काँग्रेस आता जिल्हा कार्यकारिणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना नेमका केव्हाच मुहूर्त मिळतो, याकडे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी सुमारे महिनाभरापूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसमधीलच दुसऱ्या फळीतील नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची पत्रपरिषदेत मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा नेत्यांमध्ये एकजूट झाल्याने दिल्लीपर्यंत फॅक्स गेले आणि वामनरावांना राजकीय जीवदान मिळाले. त्यांचा राजीनामा प्रदेश काँग्रेसने नामंजूर केला. कासावार यांनी सुरुवातीला काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली होती. आता त्यांचे जिल्हाध्यक्षपद कायम असले तरी कार्यकारिणी मात्र अस्तित्वात नाही. या नव्या कार्यकारिणीचे गठण होण्याची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना आहे. ही कार्यकारिणी बनविताना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना प्रतिनिधीत्व देण्याचे आणि सर्व गटातटांना सामावून घेण्याचे आव्हान कासावार यांच्यापुढे राहणार आहे. शिवाय ही कार्यकारिणी जम्बो होऊ नये याचाही विचार करावा लागणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ही कार्यकारिणी ठरविली जाणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या असंतुष्टांना नव्या कार्यकारिणीत सामावून घेतले जाते का, की त्यांना बाहेरची वाट दाखविली जाते, याकडे सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. या दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील विद्यमान मंत्री, आमदार व नेत्यांना तसेच त्यांच्या मुलांना आगामी विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी जाहीर भूमिका घेतली होती. त्यानंतर या भूमिकेवरून सहा असंतुष्टांनी फारकत घेतली. प्रमुख नऊ असंतुष्ट मात्र आपल्या भूमिकेवर कायम आहेत. त्यांनी या नेत्यांबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी छुपी मोर्चेबांधणीही चालविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या २२ सदस्यांची ३ आॅगस्टला बैठक काँग्रेस नेत्यांच्या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचा संधी मिळेल तेथे सूड उगविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या गटनेते पदावरून देवानंद पवार यांना हटविण्याची व्युहरचना केली गेली आहे. त्यासाठी ३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या २२ सदस्यांची बैठक काँग्रेस कमिटी कार्यालयात बोलविण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षांमार्फत तसे संदेश पोहोचविले जात आहे. पक्षशिस्त हा निकष पुढे करून पवार यांना हटविले जाण्याची शक्यता आहे. पवार यांना तांडा वस्ती सुधार समितीच्या जिल्हाध्यक्ष पदावरून यापूर्वीच हटविले गेले, हे विशेष. घाटंजी पाठोपाठ आर्णीत मोर्चेबांधणीगेली कित्येक वर्ष शिवाजीराव मोघे यांच्या छत्रछायेत वाढलेल्या देवानंद पवार यांनी आता अचानक लोकसभा निवडणुकीपासून मोघेंच्याच विरोधात उघडपणे बंडाचे हत्यार उपसले आहे. मोघेंना त्यांच्याच मतदारसंघात आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न देवानंद पवार यांच्याकडून सुरू आहे. कोरड्या दुष्काळाच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात घाटंजीत भरपावसात मोर्चा काढला गेला. या मोर्चाला छत्र्या घेऊन नागरिकांनी केलेली गर्दी पाहून मोघे समर्थकांमध्ये अस्वस्थता पहायला मिळाली. घाटंजीतील यशाने हुरळून जाऊन पवार यांनी आता आर्णीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानंतर केळापूर-पांढरकवडा त्यांच्या निशाण्यावर राहण्याची शक्यता आहे. आर्णीमध्ये मोघेंच्या विरोधात उघड पत्रकबाजी करणाऱ्या माजी नगराध्यक्ष अनिल आडे यांच्याकडे पवार व मोघे विरोधकांची बैठक बुधवारी पार पडली. त्यात आर्णीमध्येही मोठा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.