शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा नगर परिषदेत आर्थिक घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 21:53 IST

येथील नगर परिषदेमध्ये सन २०१४ ते २०१७ या कालावधीत झालेल्या आर्थिक घोटाळ्याचा तपास करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या आदेशामुळे नगर परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश : रजनीकांत बोरेलेंनी दाखल केली होती याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील नगर परिषदेमध्ये सन २०१४ ते २०१७ या कालावधीत झालेल्या आर्थिक घोटाळ्याचा तपास करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या आदेशामुळे नगर परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आरटीआय कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी २०१४ ते २०१७ या कालावधीत पांढरकवडा नगरपरिषदेच्या बांधकाम, आरोग्य इत्यादी विभागामध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये नगरपरिषदेच्या बांधकाम, आरोग्य तसेच विविध विभागात झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या घोटाळ्याचा तसेच निविदेतील घोटाळ्याचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा व संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. बोरेले यांच्या याचिकेवर १६ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी झाली असून यात वादी आणि प्रतिवादीचे म्हणणे ऐकून उच्च न्यायालयाने निर्णय पारित केले आहे.जनहित याचिका क्रमांक १२२/२०१८ मधील उपस्थित केलेल्या मुद्यावर सहा महिन्याच्या आत तपास पूर्ण करावा आणि त्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात यावी. सदर तपासादरम्यान अथवा अहवालादरम्यान जर कोणत्याही पक्षास तक्रार असल्यास ते या कोर्टासमक्ष येऊ शकतात.विभागीय आयुक्तांनी कंत्राटदारांना त्यांची रक्कम देण्याबाबत योग्य तो निर्णय द्यावा. विभागीय आयुक्तांनी यासंदर्भात आक्षेपांच्या तक्रारीचे निवारण करण्याकरिता चार आठवड्यामध्ये निर्णय घ्यावा, असा आदेश देऊन याचिका निकाली काढण्यात येत आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.के.देशपांडे व न्यायाधिश विनय जोशी यांनी पारित केल्याची माहिती रजनीकांत बोरेले यांनी दिली आहे.कामाची पडताळणी करूनच देयके काढण्याची मागणी२०१८-२०१९ मध्ये नगरपरिषदेतील बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व इतर विभागातर्फे झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून या कामांची पडताळणी करून कामांची देयके काढण्यात यावी, अशी मागणी रजनीकांत बोरेले यांनी केली आहे. विभागीय आयुक्त अमरावती व जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे याबाबत लवकरच आपण लेखी तक्रार दाखल करणार असल्याची माहितीही बोरेले यांनी दिली. नगरपरिषदेतर्फे होणारी विविध कामे ही निकृष्ट दर्जाची होत असून सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे रजनीकांत बोरेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजी