शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पोलीस शिपायाविरूध्द गुन्हा

By admin | Updated: June 9, 2014 00:08 IST

एका १४ वर्षीय मुलीला येथील जिल्हा कारागृहातील शासकीय निवासस्थानात नेवून बलात्कार करणार्‍या पोलीस शिपायाविरूध्द अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रविवारी दुपारी त्याला

यवतमाळ : एका १४ वर्षीय मुलीला येथील जिल्हा कारागृहातील शासकीय निवासस्थानात नेवून बलात्कार करणार्‍या पोलीस शिपायाविरूध्द अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रविवारी दुपारी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. खात्याची इभ्रत वेशीवर टांगणार्‍या या शिपायाला लवकरच निलंबित केले जाणार असल्याची माहिती आहे. राम प्रल्हाद सोळंके (२५) रा. पोलीस मुख्यालय वसाहत असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. मूळचा अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे येथील रहिवासी असलेला राम सोळंके हा चार्ली कमांडो पथकात कार्यरत होता. ६ जुनला रात्री ८.३0 वाजता तहसील चौकातून मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसविले. त्यानंतर जिल्हा कारागृहाच्या आवारातील सहकार्‍याचे नावे असलेल्या शासकीय निवासस्थानात नेवून तिच्यावर अत्याचार केला. रात्रभर अत्याचार केल्यानंतर शनिवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास तिला घराजवळ सोडून दिले. घरी पोहोचताच तिने आपबिती कथन केली. त्यानंतर पिडीत मुलीने आणि तिच्या नातेवाईकांनी वडगाव रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सुरूवातीला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्यांची मनधरणी केली. मात्र पिडीत मुलगी काही ऐकण्याच्या तयारीत नव्हती. त्यानंतर या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना देण्यात आली. त्यांनी घटनेचे गांर्भीय ओळखून तत्काळ गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यावरून पिडीत मुलीची येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा पोलीस शिपायी राम सोळंके याच्याविरूध्द भादंवि ३७६ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अटकही केली. त्याला येथील न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तपासासाठी त्याला चार दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. कुठलाही शासकीय अधिकारी-कर्मचारी एखाद्या गुन्ह्यात २४ तासापेक्षा जास्त कालावधीत कोठडीत असेल तर त्याला निलंबित करण्याचे प्रावधान आहे. त्यामुळे त्याच्या निलंबन आदेशही काढण्यात येणार असल्याची माहिती पोलिसातून देण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)