शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

४२ डिग्री तापमानात एसटी कामगारांचा न्यायासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:16 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाकडून होत असलेल्या अन्यायाविरूद्ध कामगारांनी तप्त उन्हात उपोषण सुरू केले आहे. ४२ डिग्री तापमानाने शरीराची काहिली होत असताना कामगार आपल्या हक्कासाठी लढा देत आहे.

ठळक मुद्देमहामंडळाकडून अन्याय : विभागीय कार्यालयासमोर उपोषण, कामगार संघटनेचे नेतृत्त्व, बदल्या आणि बढत्यांमध्ये अन्यायाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाकडून होत असलेल्या अन्यायाविरूद्ध कामगारांनी तप्त उन्हात उपोषण सुरू केले आहे. ४२ डिग्री तापमानाने शरीराची काहिली होत असताना कामगार आपल्या हक्कासाठी लढा देत आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पुढाकारात शुक्रवारपासून विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.ज्येष्ठता डावलून नियमबाह्य करण्यात आलेल्या बदल्या, खात्यामार्फत बढतीवर पदोन्नती, चालक-वाहकांना रात्रमुक्कामी व्यवस्था, विश्रांतीगृहातील गैरसोय, चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांचे ग्रेडेशन, वार्षिक वेतनवाढ वेळेवर न काढणे, हुकुमशाही धोरण, बदलीत मनमानी, ज्येष्ठता डावलून तसेच दोन-तीन महिने गैरहजर कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेचा विचार न करता नेमणूक, कायदे करार व परिपत्रकाचा भंग या व इतर प्रश्नांसाठी संघटनेने पाठपुरावा केला. मात्र दखल घेण्यात आली नाही. यामुळे संघटनेने उपोषण सुरू केले आहे. विभागीय सचिव राहुल धार्मिक यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात सदाशिव शिवरकर, योगेश रोकडे, हरिदास सहारे, गजेंद्र उमक, अमोल लढी, उत्तम पाटील, गजानन झुंजारकर, नितीन चव्हाण, शे. लाल आदी सहभागी झाले.एसटी प्रशासनाने दखल न घेतल्यास १५ एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे. कामगारांच्या प्रश्नांविषयी महामंडळ गंभीर नाही. उपोषणात ७०० ते ८०० कामगार सहभागी होतील असे राहुल धार्मिक यांनी कळविले आहे.आचारसंहितेत उपोषण कसे?लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. तरीही आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हा प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याचे मत काही कामगार संघटनांकडून व्यक्त होत आहे. सदर आंदोलन नियमबाह्य आहे काय आणि असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असा या संघटनांचा सूर आहे.विभाग नियंत्रकांनी बदल्या आणि बढत्याचा लावलेला सपाटाही संशयाच्या भोवºयात आहे. बदल्यांमध्ये अन्याय करायचा आणि हा अन्याय दूर करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरायच्या असा नवीन प्रयोग विभाग नियंत्रकांनी सुरू केला असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप