शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटींच्या पाणलोट कामांची पाचव्यांदा चौकशी

By admin | Updated: August 24, 2014 00:14 IST

पुसद वन विभागांतर्गत विदर्भ पाणलोट विकासाच्या १३ कोटी रुपयांच्या कामांची तब्बल पाचव्यांदा चौकशी केली जात आहे. या कामांचे सूत्रधार तत्कालिन उपवनसंरक्षक जी.एस. बल्की

पुसद वन विभाग : प्रधान सचिवांनी अहवाल मागितलायवतमाळ : पुसद वन विभागांतर्गत विदर्भ पाणलोट विकासाच्या १३ कोटी रुपयांच्या कामांची तब्बल पाचव्यांदा चौकशी केली जात आहे. या कामांचे सूत्रधार तत्कालिन उपवनसंरक्षक जी.एस. बल्की ३१ आॅगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश प्रधान वन सचिवांनी दिले आहेत. विदर्भ पाणलोट विकासांतर्गत पुसद वन विभागातील महागाव, उमरखेड, पुसद, दिग्रस या तालुक्यांमध्ये सन २०१०-११ ला सुमारे १३ कोटी रुपयांची कामे करण्यात आली होती. वन परिक्षेत्रांतर्गत दगडी बांध, सलग चर या सारखी पाणलोट विकासाची कामे केली गेली. परंतु या कामांमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या कामातील कमिशनचा दर तब्बल २० टक्क्यांवर गेल्याने बहुतांश कामे कागदोपत्री झाली. नियमानुसार या कामांचे पेमेंट चेकद्वारे देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात रोखीने दिले गेले. बहुतांश कामे मशीनने आणि त्यातही थातूरमातूर केली गेली. पुसदचे तत्कालिन उपवनसंरक्षक जी.एस. बल्की यांच्या मार्गदर्शनात ही कामे केली गेली. बल्की सध्या सामाजिक वनीकरण विभागात वाशिम येथे उपसंचालक म्हणून कार्यरत आहे. पाणलोट विकासाच्या या कामांसाठी ठिकठिकाणी वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली होती. सचिव आणि अध्यक्षांच्या स्वाक्षरीने या योजनेचा पैसा काढला गेला. विशेष असे, सदर कामे वाटप करताना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली गेली. मित्रमंडळ संस्थानच्या नावाने कामांचे वाटप झाले होते. अनेक वन व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्षही कोट्यवधींच्या या पाणलोट विकास कामांच्या घोटाळ्यात सहभागी आहे. या कामांचे देयक हे चेकने नव्हेतर रोखीने द्यावे म्हणून वन प्रशासनाचा आग्रह होता. मात्र काही चाणाक्ष वनपालांनी भविष्यातील धोका ओळखून धनादेशानेच पेमेंट केले. १३ कोटींपैकी बहुतांश कामे आणि दहा सदस्यीय वन व्यवस्थापन समित्या कागदावरच दाखविल्या गेल्या. प्रत्यक्षात वन जमिनीवर कामांचा पत्ताच नाही. कागदावर कामे दाखवून वन खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साखळीने मोठी रक्कम हडपली. या प्रकरणाच्या तक्रारी झाल्यानंतर यवतमाळ येथील दक्षता अधिकारी मोरणकर, नागपूर येथील वन अधिकारी चौबे आदींच्या नेतृत्वात चौकशा झाल्या. आतापर्यंत तब्बल चार वेळा या घोटाळ्याची चौकशी केली गेली. मात्र प्रत्यक्षात कारवाई कुणावरच झाली नाही. चौकशीत कुठेतरी पाणी मुरत असल्याची कुणकुण राज्याचे प्रधान वन सचिव प्रवीणकुमार परदेशी यांना लागली. म्हणून त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पुसदच्या या घोटाळ्याची नव्याने सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचे उपवनसंरक्षक (दक्षता) संजय दहीवले यांच्याकडे चौकशी सोपविली गेली. गेल्या पाच दिवसांपासून ते पुसदमध्ये मुक्कामी आहेत. त्यांनी उमरखेड, महागाव, शेंबाळपिंपरी व अन्य भागात प्रत्यक्ष काम झालेल्या ठिकाणांची पाहणी व तपासणी केली. वन व्यवस्थापन समिती अध्यक्षांची बयाणे नोंदविली गेली असून या समितीचे सचिव असलेल्या वनपालांची बयाणे नोंदविली जात आहे. शनिवारी डीएफओ दहीवले यांनी दिग्रस वन परिक्षेत्रात याची पाहणी केली. पाचव्यांदा चौकशीमागे बल्की यांची तोंडावर आलेली सेवानिवृत्ती हेसुद्धा एक प्रमुख कारण सांगितले जाते. ३१ आॅगस्टला ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा काही सहभाग असेल तर कारवाई करता यावी म्हणून प्रवीण परदेशी यांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, हे विशेष! (जिल्हा प्रतिनिधी)