शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

यवतमाळ विधानपरिषदेसाठी शिवाजी सावंत यांची फिल्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 6:00 AM

प्रा. शिवाजी सावंत हे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तर भैरवनाथ सहकारी साखर कारखाना अंतर्गत सोनारी, विटाळा, लवंगी आणि वाशी या अनुक्रमे युनिट १ ते ४ चे उपाध्यक्ष आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे रहिवासी असलेले प्रा. शिवाजी सावंत यांची राजकीय कारकीर्द २००२ मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या मानेगाव गटातून सुरू झाली. ते शिवसेनेकडून तेथे विजयी झाले होते.

ठळक मुद्देशिवसेनेचा दावा कायम : उर्वरित चार वर्षे भावाकडे वळते करणार काय?

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून जाताच त्यांची विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील उर्वरित चार वर्षे मिळविण्यासाठी प्रा. तानाजींचे मोठे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांनी फिल्डींग लावली आहे.यवतमाळातून प्रा. तानाजी सावंत ५ डिसेंबर २०१६ ला विधानपरिषदेवर निवडून गेले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमपरांडा मतदारसंघातून शिवसेनेकडून विजयी झाले. त्यामुळे त्यांची यवतमाळातील विधानपरिषदेची जागा रिक्त झाली. या जागेसाठी जिल्ह्यातील सहकार, शासकीय कंत्राटदार, बीअरबार व्यावसायिक तथा पुण्यातील उद्योजक, शिवसेनेचे पराभूत उमेदवार व अनेक राजकीय मंडळींनी मोर्चेबांधणी चालविली आहे. परंतु प्रत्यक्षात आणखी साडेतीन-चार वर्षे शिल्लक असलेल्या यवतमाळ विधानपरिषदेच्या जागेवर सावंत परिवारातील सदस्यच दावा करणार आहे. यवतमाळच्या या जागेची मुदत ५ डिसेंबर २०२२ ला संपणार आहे. आणखी साडेतीन-चार वर्ष उरलेली आहेत. त्यामुळे ही जागा इतरांना जाऊ न देता घरातच कायम ठेवण्याचा विचार सावंत परिवारात सुरू असल्याचे सांगितले जाते. यातूनच प्रा. तानाजी यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी जयवंत सावंत यांनी यवतमाळच्या विधानपरिषदेच्या जागेवर लक्ष केंद्रीत केले आहे.प्रा. शिवाजी सावंत हे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तर भैरवनाथ सहकारी साखर कारखाना अंतर्गत सोनारी, विटाळा, लवंगी आणि वाशी या अनुक्रमे युनिट १ ते ४ चे उपाध्यक्ष आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे रहिवासी असलेले प्रा. शिवाजी सावंत यांची राजकीय कारकीर्द २००२ मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या मानेगाव गटातून सुरू झाली. ते शिवसेनेकडून तेथे विजयी झाले होते. २००४ मध्ये त्यांनी माढातून विधानसभा लढविली. दरम्यान २००७ ला सावंत बंधूंनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत घरठाव केला. ते सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे नेते झाले. मात्र तेथे मन न रमल्याने सावंत बंधूंची २००९ ला घरवापसी झाली. ते पुन्हा सेनेत सक्रिय झाले. २००४, २००९, २०१४ अशा तीन विधानसभा निवडणुका प्रा. शिवाजी सावंतांनी सेनेकडून लढल्या. मात्र ते पराभूत झाले. आमदार होण्याची महत्वाकांक्षा ते बाळगून आहेत. त्यामुळेच त्यांनी आता यवतमाळची विधानपरिषद कायम ठेवण्यासाठी फिल्डींग लावली. प्रा. शिवाजी हे २००९ पासून आतापर्यंत सोलापूरचे सेनेचे संपर्क प्रमुख आहे.सुकामेवा वाटपाने ‘जमीन गैरव्यवहार’ही चर्चेतएकूणच विधानपरिषद निवडणुकीत पैसाच निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक चेहरे चर्चेत आहे. त्यापैकीच सुकामेवा वितरित करणारा एक इच्छुक चर्चेत आला. मात्र त्याची ओळख पटताच त्याच्या जुन्या भानगडीही एकापाठोपाठ पुढे आल्या. काही वर्षांपूर्वी या इच्छुकाने चापर्डा गावाच्या परिसरात कुळाच्या जमिनींचे व्यवहार केले होते. नाममात्र रकमेत आदिवासींची दिशाभूल केली गेली. पुढे याच जमिनी जादा दराने समाज कल्याण विभागामार्फत शासनाला विकल्या गेल्या. समाज कल्याणच्या जमीन खरेदी घोटाळ्याची आजही येथील आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. यातील काही आरोपींना अलिकडेच अटक झाली. या व्यवहारातील पैशातूनच पुढे बीअरबारचा व्यवसाय फोफावला. एकेकाळी येथील एका राजकीय नेत्याच्या दुकानात काम करणारा व्यक्ती अचानक विधानपरिषद निवडणुकीच्या तयारीचे संकेत देत असल्याने त्याला आधीपासून ओळखणाऱ्यांचे मात्र डोळे विस्फारले आहे.भाजप, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी नाराजयवतमाळ विधानपरिषदेसाठी प्रा. शिवाजी सावंत यांच्या नावाची चर्चा असली तरी भाजप, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना हे नाव चालेल का याबाबत साशंकता आहे. कारण मुळात मतदार असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा तानाजींवर रोष आहे. विधानपरिषदेची निवडणूक जिंकून गेलेले तानाजी परत यवतमाळात आलेच नाही. शिवाय त्यांचा विकास निधी मतदार असलेल्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचलाच नाही. गेली तीन वर्ष या निधीची सूत्रे यवतमाळातील विशिष्टच व्यक्तींच्या हाती होती. निवडणुकीच्या वेळी झालेल्या व्यवहारांबाबतही पारदर्शकता राहिली नसल्याची ओरड ऐकायला मिळते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा सावंत बंधूंना मतदार पसंती दर्शवितील का? याबाबत साशंकता आहे.सावंतांची एन्ट्री झाल्यास मिळणार ‘बुस्ट’सावंतांची एन्ट्री झाल्यास काहींनी निवडणुकीचा झालेला खर्च काढण्याची तर मतदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या आगामी निवडणुकीसाठी आर्थिक तजवीज करून घेण्याची व्यूहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळात तीन वेगवेगळ्या पक्षातील ‘अनुभवी’ नगरसेवक एकत्र आले आहे. त्यांनी मतदारांचा वेगळा गट तयार करून त्यांच्यामार्फत व्यवहार करण्याची व नेत्यांना दूर ठेवण्याची योजना तयार केल्याचे सांगितले जाते. या अनुषंगाने सदर नगरसेवकांनी आपल्या सहकारी मतदार बांधवांच्या भेटी-गाठी घेऊन प्राथमिक माहितीही त्यांना दिली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना