शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांशी जीवघेणा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:25 IST

सहकारी तत्वावरील साखर कारखाने बंद पडल्याने खाजगी व्यवस्थापनाचे साखर कारखाने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. तोंड पाहून उसाची तोड होत असल्याने अनेकांच्या शेतात ऊस उभा आहे.

ठळक मुद्दे शेतात ऊस उभाच : सहकारातील साखर कारखाने बंद पडल्याने शेतकरी रडकुंडीला

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : सहकारी तत्वावरील साखर कारखाने बंद पडल्याने खाजगी व्यवस्थापनाचे साखर कारखाने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. तोंड पाहून उसाची तोड होत असल्याने अनेकांच्या शेतात ऊस उभा आहे. यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी रडकुंडीला आले आहे.महागाव, उमरखेड तालुक्यातील दोन सहकारी साखर कारखाने बंद झाले. गुंज येथील साखर कारखाना खाजगी व्यवस्थापनाला विकण्यात आला तर वसंतची त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे. दोन्ही तालुक्यात सुपिक जमीन आणि मुबलक पाणी आहे. त्यामुळे याभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. परंतु राजकारण्यांनी दोन्ही कारखान्याची वाट लावली. आता गुंज येथील साखर कारखाना नॅचरल शुगरने विकत घेतला आहे. त्यातच यंदा ऊस पळविण्याची स्पर्धा दिसत नाही.खाजगी कारखाना रिकव्हरी देणाऱ्या फडाला हात लावत आहे. पावणे दोन लाख मेट्रीक टन गाळप नॅचरल शुगरने केले आहे. कारखान्याची रिकव्हरी ११.८० आहे. रिकव्हरी लपविल्या जात असल्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. रिकव्हरी तपासण्यासाठी साखर आयुक्तांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांचा ऊस तोडण्याची आवश्यकता आहे. मात्र महागाव आणि पुसद तालुक्यात ऊसतोड टोळ्यात फिरताना दिसत नाही.पिळवणूक होऊनही सर्वच गप्पमहागाव, पुसद आणि उमरखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खासगी कारखाने पिळवणूक करीत आहे. मात्र या कारखान्याच्याविरुद्ध कुणीही बोलायला तयार नाही. शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांना दिलासा दिला जात नाही. सर्व लोकप्रतिनिधी मात्र गप्प असल्याचे दिसून येते.