शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोळसाखाणग्रस्त शेतकºयांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 21:56 IST

वेस्टर्न कोल लिमिटेड या कोळसा कंपनीच्या वणी नॉर्थ एरियातील बेलार, बेलसनी, कुंभारी (रिट) येथील शेतकºयांना मागील पाच वर्षांपासून शेतीचा मोबदला मिळालेला नाही.

ठळक मुद्देमोबदला नाही : महसूल व वेकोलिच्या दिरंगाईने जगणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वेस्टर्न कोल लिमिटेड या कोळसा कंपनीच्या वणी नॉर्थ एरियातील बेलार, बेलसनी, कुंभारी (रिट) येथील शेतकºयांना मागील पाच वर्षांपासून शेतीचा मोबदला मिळालेला नाही. महसूल विभागाने तुकडेबंदीच्या नियमाची ऐसीतैसी करून सातबाºयामध्ये प्रचंड घोळ केला आहे. त्यामुळे वेकोलिने शेतीचा मोबदलाच दिला नाही. हा अन्याय दूर व्हावा यासाठी तिन्ही गावातील शेतकºयांनी यवतमाळ येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.नायगाव डीप ओपनकास्ट या कोळसा खाणीत तीन गावातील शेतकºयांची जमीन गेली. यासाठी २०१२ पासून भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्यक्षात कोणताच मोबदला शेतकºयांना मिळाला नाही. या बाबत सातत्याने पाठपुरावा करूनही वेकोलि व महसूल प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाते. ही समस्या घेऊन शेतकरी १३ आॅक्टोबर रोजी यवतमाळला आले. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना या प्रकरणात १५ दिवसामध्ये तोडगा काढावा अशा मागणीचे निवेदन दिले. यावर कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी शेतकºयांनी सोमवारपासून पोस्टल मैदान परिसरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.वेकोलि व महसूल प्रशासनाने शेतकºयांना शेतीचा मोबदला आणि वेकोलित नोकरी द्यावी या दोन प्रमुख मागण्या आहेत. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. वेकोलिने भूसंपादनासाठी २७ आॅक्टोबर २०१७ मध्ये कायद्यातील सेक्शन ११ सीबीएचा आधार घेऊन त्वरित प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप शेतकºयांना कोणताच लाभ मिळालेला नाही. मोबदला नसतानाही प्रकल्पबाधित शेतकरी जमीन वहिती करू शकत नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. उपोषणात शंभरावर शेतकरी सहभागी झाले आहे.