कळंब : काँग्रेसच्या जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा रविवारी येथील चिंतामणी मैदानावर पार पडला. अध्यक्षस्थानी खासदार राजीव सातव होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, माजी आमदार विजय खडसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, संध्याताई सव्वालाखे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनिवार्चीत सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ना. माणिकराव ठाकरे म्हणाले, कुठल्याही घडामोडीत आपली भूमिका काँगे्रस पक्षाच्या हिताचीच राहिली आहे. जिल्हा परिषदेची खेळी करताना सर्वांना विश्वासात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार सातव, शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, विजय खडसे, माधुरी आडे, डॉ. नदीम शेख, वजाहत मिर्झा आदींनी विचार मांडले. संचालन राजेंद्र पोटे यांनी केले. आभार फारूक सिद्दीकी यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
By admin | Updated: March 27, 2017 01:18 IST