शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

गुंडप्रवृत्तीमुळे घेतलेल्या निर्णयाने कमालीचे दु:ख झाले - डॉ. राणी बंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 21:41 IST

विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला.

ठळक मुद्देसुसंस्कृत समाजात मात्र एकट्या स्त्रीला वावरणे अवघड बनले आहे

प्रज्ञा केळकर-सिंग ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : वऱ्हाडी परंपरेमध्ये कार्यक्रमाला न बोलावलेल्या माणसाचेही मनापासून स्वागत केले जाते. संमेलनाच्या सुरुवातीला आमंत्रण नाकारल्याच्या घटनेमुळे खूप दु:ख झाले. गुंडप्रवृत्तीमुळे आयोजकांना हा अप्रिय निर्णय घ्यावा लागला. विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला.‘वर्धेला विनोबा भावेंनी जय जगतचा नारा दिला. मराठीचा अभिमान बाळगणारे आपण मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतो आणि संमेलनात येण्यास इंग्रजी लेखिकेला नकार देतो, हा कोणता न्याय’, असा सवाल राणी बंग यांनी उपस्थित केला.बंग म्हणाल्या, ‘शिक्षणाने शहाणपण येते, असे मला वाटत नाही. शिकलेले लोक महामूर्ख असतात, तर अशिक्षित लोक जास्त शहाणे असतात. आधुनिकता म्हणजे धिंगाणा, व्यसनाधीनता, वाटेल तसे वागणे, असे शिकलेल्याना वाटते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे नवीन पिढीने जाणून घेतले पाहिजे. साजरे करणे ही आपली प्रवृत्ती बनली आहे. आपल्या वागण्याला उत्सवी रूप आले आहे. लग्नसोहळा खर्चिक करण्याची सवय आपल्याला लागली आहे. गरीब लोकही श्रीमंतांचे अनुकरण करतात. त्यामुळे समाज संस्कृती बिघडत चालली आहे. सौंदर्याला अमाप महत्व दिले जाते. सौंदर्य प्रसाधनांचे दुष्परिणाम अनेक जणी भोगत आहेत. तरीही, अभिनेत्री सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती करताना दिसतात. दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्व द्यावे, हे तरुणाईला समजून सांगितले पाहिजे’. सना पंडित आणि डॉ. मोना चिमोटे यांनी बंग यांच्याशी संवाद साधला.आदिवासी लोक जास्त सुसंस्कृत की आपण? असा मला नेहमी प्रश्न पडतो. आदिवासी लोकांमध्ये चोरी होत नाही, त्यांच्यात एकही भिकारी नाही, तेथील मुली, स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत. सुसंस्कृत समाजात मात्र एकट्या स्त्रीला वावरणे अवघड बनले आहे.प्रतिभावंतांचा सहवास लाभलाच नाहीसाहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉ. विजय भटकर, माधव गाडगीळ, चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. राणी बंग यांच्याशी संवाद साधला जाणार होता. मात्र, या कार्यक्रमाला राणी बंग वगळता इतर तिन्ही मान्यवर अनुपस्थित होते. त्यामुळे ‘प्रतिभावंतांचा सहवास लाभलाच नाही’ अशी भावना उपस्थितांमध्ये पहायला मिळाली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन