शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

४५ टक्के विद्युत मीटर फॉल्टी

By admin | Updated: August 9, 2014 23:58 IST

सगळ्यांसाठीच जीवनावश्यक असलेल्या विजेसाठी सर्वांना वीज कंपनीवर अवलंबून राहावे लागते. इतर दुसरा कोणताही पर्याय याबाबत नागरिकांकडे नाही. याचाच गैरफायदा घेऊन वीज कंपनी

वसंतनगर : सगळ्यांसाठीच जीवनावश्यक असलेल्या विजेसाठी सर्वांना वीज कंपनीवर अवलंबून राहावे लागते. इतर दुसरा कोणताही पर्याय याबाबत नागरिकांकडे नाही. याचाच गैरफायदा घेऊन वीज कंपनी वाटेल तशी नागरिकांची पिळवणूक करीत आहे. याचा प्रत्यय नुकताच वसंतनगर परिसराला आला. या ठिकाणी महावितरणने तब्बल ४५ टक्के मीटर फॉल्टी दाखविले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मीटर नादुरुस्तीचा परिसरातील हा विक्रमच म्हणावा लागेल.ग्राहकांना नाहक त्रास देण्याच्या प्रयत्नात महावितरणने वसंतनगर व वरंदळी मिळून असलेल्या ३०९ विद्युत मीटरपैकी तब्बल १४६ मीटर फॉल्टी दाखविले. वसंतनगर येथे ३३ केव्ही उपकेंद्र असूनसुद्धा विजेचा पुरवठा नियमित होत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. वीज खांबाजवळच्या किंवा झाडाजवळून गेलेल्या विद्युत तारांना वारंवार झाडाच्या फांद्या लागत असल्याने वीज पुरवठा सतत खंडित होतो. लाईनमन मुख्यालयी राहात नसल्याने खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी खासगी लाईनमनचा आधार घ्यावा लागतो. आपला जीव धोक्यात टाकून अप्रशिक्षित लाईनमन खांबावर चढतात. अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीकडून वीज पुरवठा दुरुस्त करून घेणे अतिशय धोकादायक आहे. अशा वेळी कोणतीही दुर्घटना घडू शकते. परंतु वीज कंपनीचा लाईनमनच उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांचा नाईलाज आहे. मागील महिन्यात विठोली फिडरवर काम करताना सहाय्यक लाईनमनला विजेचा धोरदार झटका बसल्याने त्याला आपला एक हात गमवावा लागला होता. महावितरणने एकाच गावात ४५ टक्के मीटर एकाचवेळी फॉल्टी दाखविल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. सरासरी बिल पूर्वीच्या बिलाच्या तिप्पट येत असून ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. कंपनी सध्या सरसकट विद्युत ग्राहकांना किमान ५०० रुपयांच्या वरचे बिल देवून मोकळे होत आहे. या संदर्भात कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतल्या जात नसून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांमधून होत आहे. गारपीट, महापूर, अतिवृष्टी आदींच्या तडाख्यात सापडल्यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग आधीच जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्यातच आता महावितरणनेसुद्धा त्रास देणे सुरू केले आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराने जनता त्रस्त झाली असून याचा परिणाम सार्वजनिक पाणीपुरवठ्यावरसुद्धा झाला आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज बिल न भरता स्वत:जवळ ठेवतात. याचाही फटका ग्रामस्थांना बसत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून महावितरण कंपनीने ग्रामस्थांना नियमित वीज पुरवठा द्यावा व फॉल्टी मीटरची चौकशी करून बदलवून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)