शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील शिरोलीत चिमुकलीसह बापाची विहिरीत उडी; बापाचा मृत्यू ; मुलगी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:49 IST

यवतमाळ तालुक्यातील शिरोली येथे एका युवकाने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन विहिरीत उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला तर ती चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला यवतमाळच्या शासकिय रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. ही घटना मंगळवारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ - तालुक्यातील शिरोली येथे एका युवकाने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन विहिरीत उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला तर ती चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला यवतमाळच्या शासकिय रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. ही घटना मंगळवारी घडली.किशोर शं.आत्राम (वय ३० वर्षे) रा. शिरोली असे या तरुणाचे नाव आहे. त्याने मंगळवारी दुपारी गावाशेजारी शेतात असलेल्या विहिरीत स्वत:च्या दोन वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेऊन घरच्यांचे लक्ष चुकवित विहिरीत उडी मारली. तेव्हा ही बाब गावातील काही लोकांच्या लक्षात येताच त्यानी त्या विहिरीत उड्या मारून त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न केला. तेव्हा दोन वर्षिय चिमुकली प्रिती हिला विहिरीतून पाण्याबरोबर काढले. तिला प्रथम रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र व नंतर घाटंजी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले . इकडे किशोर हा विहिरीच्या तळाशी गेल्याने व विहिरीत पाणी भरपूर असल्याने सापडला नाही. घटनेची माहिती घाटंजी पोलीसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्याची विहिरीत शोधाशोध केली असता किशोरचा मृतदेह सापडला. तेव्हा घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला परंतु सायंकाळी वेळ झाल्यामुळे मंगळवारी शवविच्छेदन होऊ शकले नाही.किशोर हा पत्नी भिमाबाई व दोन मुली प्रिया व प्रिती हे कुटुंब राहत होते. या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा रोजमजुरीवर होत असे. परंतु आज अचानक चिमुकल्या लहान मुलीसह विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचे कारण समचू शकले नाही..

टॅग्स :Deathमृत्यू