शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

नियती हरली, सुरज जिंकला

By admin | Updated: February 1, 2015 23:03 IST

रात्रीचा मिट्ट काळोख... कुणाच्याही डोळ्यात झोप नाही... यंत्रांचा खोदण्याचा खणखणाट... ‘सुरज मी आहे रे, काळजी करू नको’ अशी आईची आर्त साद... सर्वांच्या नजरा लागलेल्या...

१२ तासांची झुंज यशस्वी : सुरज मी आहे रे, काळजी करू नको, आईची आर्त साद अविनाश खंदारे/ देवानंद पुजारी ल्ल निंगनूर (ता. उमरखेड) रात्रीचा मिट्ट काळोख... कुणाच्याही डोळ्यात झोप नाही... यंत्रांचा खोदण्याचा खणखणाट... ‘सुरज मी आहे रे, काळजी करू नको’ अशी आईची आर्त साद... सर्वांच्या नजरा लागलेल्या... ठीक २ वाजून ३० मिनिटांनी आई-आई म्हणत सुरज बाहेर आला... सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला... पुष्पाच्या काळजाचा तुकडा तब्बल १२ तास मृत्यूशी झुंज देत बाहेर पडला. नियती हरली, सुरज जिंकला. उमरखेड तालुक्याती निंगनूर येथील शेतातील बोअरवेलमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजता सुरज शंकर आखरे हा अडीच वर्षीय बालक अचानक कोसळला. कोसळताना त्याने जोरात आई अशी आरोळी ठोकली. ती आरोळी मातेच्या हृदयाला छेदून गेली. आई धावत आली. पाहतो तर काय काळजाचा तुकडा बोअरवेलमध्ये पडलेला. आसपासच्या शेतकऱ्यांना बोलावून मदतीचा प्रयत्न सुरू झाला. सुरजला दोराच्या सहाय्याने वर काढण्याचा प्रयत्न होत होता. दोन वेळा सुरज दोर धरुन दहा फूट वर आला. परंतु चिमुकले हात थकले. दोर सुटला आणि तो १५ फुटावरून थेट ४० फूट खाली गेला. आता काय करावे सर्वांची पाचावर धारण बसली. तत्काळ उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला, तहसीलदार सचिन शेजाळ यांना घटनेची माहिती देण्यात आली. तातडीने दोन जेसीबी मशीन खोदकामासाठी लावण्यात आल्या. मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू असतानाच सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आपत्ती प्रक्रिया दलाचे सात जवान दाखल झाले. बोअरवेलच्या खड्ड्याजवळ बसून सुरजची आई पुष्पा धीर देत होती. निमुळत्या सहा इंची बोअरवेलमध्ये सुरज मृत्यूशी झुंज देत होता. आपल्या आईशी केविलवाणा संवाद साधत होता. मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती पंचक्रोशीत पसरली. हजारो नागरिक त्या ठिकाणी गोळा झाले. बोअरवेलच्या बाजूला समांतर ४० फूटचा खड्डा खोदण्यात आला. आपत्ती प्रक्रिया दलाच्या जवानांनी बोअरवेल ते खोदलेल्या खड्ड्यादरम्यान महत प्रयासाने भुयार खोदले. रात्री २.३० वाजताच्या दरम्यान सुरज अलगद आपत्ती प्रक्रिया दलाच्या हातात सुखरुप आला. त्याला घेऊन जवान बाहेर आले. त्यावेळी सर्वांनी एकच गलका केला. आई पुष्पाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. आईला पाहताच सुरज भेदरल्या डोळ्याने तिला जाऊन बिलगला. माय-लेकांची ही भेट तेथे उपस्थित हजारोंनी अनुभवली. सुरज जिंकला नियती हरली. माय-लेकांचा संवाद पाझर फोडणारासुरज बोअरवेलमध्ये पडला त्या क्षणापासून त्याची आई पुष्पा बोअरवेलजवळच ठाण मांडून बसली होती. आतमध्ये पडलेल्या चिमुकल्याला व्याकूळ नजरेने पाहत होती. मिट्ट अंधारात तिला दिसतही नव्हते. मात्र आतून येणारा आवाज तिला बळ द्यायचे. सुरज मी आहे रे, तु काही काळजी करु नको असा आवाज ती देत होती. आतून सुरज म्हणत होता, ‘आई बाबाला सांगना मला लवकर बाहेर काढायला’ तेव्हा पुष्पा म्हणत होती थांब बाळा बाबा तुला काढण्यासाठी पायऱ्या करीत आहे. तुला घेण्यासाठी तुझ्या जवळ येत आहे. मायलेकातील हा संवाद किती तरी तास सुरू होता. पाषाण हृदयी माणसाच्या काळजाला पाझर फोडणारा हा संवाद ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. आईच्या आर्त आवाजासमोर नियती हरली. तब्बल १२ तासाने सुरज अगदी सुखरुप बाहेर आला. सुरज जीव घेण्या संकटातून दुसऱ्यांदा बचावलाबोअरवेलच्या खड्ड्यातून मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या सुरजवर झालेला हा दुसरा जीवघेणा प्रसंग होता. सुरज एक वर्षाचा असताना त्याचे आई-वडील आंध्रप्रदेशातील बेला येथे कापूस वेचण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुरजही सोबत होता. कापूस वेचताना सुरजला पाळण्यात ठेवले होते. दरम्यान एका वन्य प्राण्याने त्याला तोंडात पकडून उचलून नेले. आरडाओरडा झाल्याने ३०० फूट अंतरावर त्याला टाकून त्या प्राण्याने पळ काढला. विशेष म्हणजे तो दिवसही शनिवार होता आणि बोअरवेलमध्ये पडला तो दिवसही शनिवार.