दिग्रस : तालुक्यातील झिरपूरवाडी येथील नागरिक शुद्ध पाण्याच्या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषणाला बसले आहे. या उपोषणात सरपंच आणि उपसरपंचही सहभागी झाले आहेत. झिरपूरवाडी येथे भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात आले. पाईपलाईनचे कामही झाले. परंंतु गावाला मिळणारे पाणी गळतीमुळे गढूळ आणि दुर्गंध युक्त येते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार विनंती करूनही उपयोग झाला नसल्याने अखेर येथील नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंंभ केला. यात सरपंच अरुण शंकर जुळे, उपसरपंच महानंदा किसन खंडाळे, प्रेमिला मिरासे, वसराम राठोड, चंपत ढोके, रामराव डहाणे यांच्यासह गावकरी सहभागी झाले आहे. या प्रकरणी काय निर्णय लागतो याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले.
झिरपूरवाडीच्या नागरिकांचे उपोषण
By admin | Updated: October 28, 2015 02:41 IST